संग्रहित फोटो
पुणे : पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हडपसर भागातील मांजरी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वैशाली रमेश देवकुळे (वय ४०, रा. लटके वडापाव दुकानाजवळ, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देवकुळे यांचे घर बंद होते. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला. गुरुवारी देवकुळे बाहेरगावाहून परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार शिंगाडे अधिक तपास करत आहेत.
एटीएमची तोडफोड
मांजरी भागातील बेल्हेकर वस्तीत बँकेच्या एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत हर्षद सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाणयात तक्रार दिली आहे. मांजरीतील बेल्हेकर वस्ती, तसेच या भागातील दोन एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.
कराडमध्ये धाडसी चोरी
मलकापूर (ता. कराड) येथील औदुंबर कॉलनीत दरवाजा उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूरमधील आगाभाई चाळ येथे ही चोरीची घटना घडली आहे. याबाबत शाहीन साजिद आगा यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.