Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Crime: चोरट्यांनी घरात जाऊन कोयत्याचा धाक दाखवला अन्…; ‘त्या’ कुटुंबासोबत नेमके घडले काय?

दिवसात एक- दोन तास वीजपुरवठा सुरळीत असतो. अनेकदा रात्रीचा विद्युत पुरवठा चार - पाच तास बंद असतो. या फायद्याद्वारे चोरट्यांनी परिसराला टारगेट केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2025 | 02:35 AM
Karad Crime: चोरट्यांनी घरात जाऊन कोयत्याचा धाक दाखवला अन्…; ‘त्या’ कुटुंबासोबत नेमके घडले काय?
Follow Us
Close
Follow Us:
मसूर: वा हेळगाव ता. कराड येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला व कुटुंबातील लोकांना कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण व कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखावर डल्ला मारला. जबरी चोरीचा प्रकार शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शेजारील बंद घरे फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेळगावला कराड – कोरेगाव रस्त्यालगतच्या सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराचा किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढून आत प्रवेश केला. त्यावेळी सुनंदा या जाग्या झाल्या. टी-शर्ट व बरमोडा घातलेला ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरट्यांनी सुनंदा सूर्यवंशी यांना कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने त्यांच्या व मुलीच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून घेतले.

किचनच्या शेजारील बेडरूम मधील लोखंडी कपाट ड्रॉवर उचकटाऊन सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे डूल असा एकूण सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत उसाच्या शेतातून पोबारा केला. चोरट्यांनी बाजूच्या नंदा हनमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे,बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरीची फिर्याद सुनंदा सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात दिली आहे. तपास सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत.krai

११२ नंबरची जागरूकता…

चोरीचा प्रकाराबाबत मुलीने ११२ नंबर डायल केला. तात्काळ एलसीबी सातारा, कराड शहर व कराड तालुका डीबी पथक, उंब्रज, तळबीड, मसूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ तारगाव खिंड, पाडळी इतर ठिकाणी नाकाबंदी केली. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

माणुसकी हरवली ! पुण्यात अपघातानंतर मदत करण्याऐवजी दाम्पत्याला लुटलं

सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोपीस… ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ….

हेळगावमधील सीसीटीव्ही कॅमेरे वर्षभरापासून बंद आहेत. अनेकवेळा ग्रामसभेत याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. मात्र ग्रामपंचायतीकडून गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे चोरी प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले नाहीत. गावातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीस बनले आहेत. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे.
विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर….
तीन आठवड्यापासून दिवस रात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसात एक- दोन तास वीजपुरवठा सुरळीत असतो. अनेकदा रात्रीचा विद्युत पुरवठा चार – पाच तास बंद असतो. या फायद्याद्वारे चोरट्यांनी परिसराला टारगेट केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे.

Web Title: Thieves have stolen jewellery worth rs 25 lakhs by showing fear of koyata helgaon karad crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Karad
  • Karad Crime

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.