Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: ‘आपल्या नात्यातील मुलीकडे पाहतो म्हणून…’; 19 वर्षीय युवकासोबत घडली हृदयद्रावक घटना

दरम्यान हे तिघे संशयित पसार झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली असल्याचे पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 20, 2024 | 06:08 PM
Baramati Crime: 'आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो म्हणून...'; 19 वर्षीय युवकासोबत घडली हृदयद्रावक घटना

Baramati Crime: 'आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो म्हणून...'; 19 वर्षीय युवकासोबत घडली हृदयद्रावक घटना

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: आपल्या नात्यातील एका मुलीकडे पाहतो व तिच्याशी सतत बोलतो या कारणावरून एका १९ वर्षीय युवकाचा बारामती शहरातील प्रगतीनगर याठिकाणी गुरुवारी (ता. १९) रात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने बारामती हादरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (रा. देसाई इस्टेट,बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून हा युवक बारामती नगर पालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून काम करत होता.

या प्रकरणी त्याचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी शहर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगती नगर, बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड, जिजामाता नगर, बारामती) व संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी रात्री बारामती शहरातील प्रगती नगर परिसरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास अनिकेत गजाकस याच्यावर तीन अज्ञात युवकांनी कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान हे तिघे संशयित पसार झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली असल्याचे पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी सांगितले.

या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपीच्या मावस बहिणीशी सतत बोलतो, या कारणावरून अनिकेत याचा तिघांनी खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अनिकेत चे वडील रिक्षा चालवतात, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या भागापासून जवळच असणाऱ्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अशाच पद्धतीने खून झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा याच परिसरात निर्घृण खून झाल्याने मोठी बारामती शहरात पुन्हा भीतीचे 5वातावरण तयार झाले आहे.

पुणे हादरलं! कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने हल्ला

कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या वादातून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. रोहित प्रकाश पारख (वय २९, रा. वडगाव शेरी), अक्षय पाटोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कल्पेश फकीरचंद रंगारी (वय ४२, रा. फाॅरेस्ट पार्क सोसायटी, लोहगाव) याला अटक केली आहे. याबाबत रोहित पारख यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा: पुणे हादरलं! कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…

पोलिसांच्या माहितीनुसार, पारख आणि त्याचा मित्र पाटोळेने रंगारी यांचे काम केले होते. कामाचे पैसे मागितल्याने रंगारी आणि पारख यांच्यात वाद झाला. पारख आणि पाटोळे रंगारी याच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी रंगारीने पारख यांना शिवीगाळ केली. रंगारीने घरातून कोयता आणला. त्याने पारख यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी पाटोळेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पाटोळे यांच्यावरही कोयत्याने वार केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.

Web Title: Three criminals attack to youth with weapon youth loss their life baramati crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
3

Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत

धावत्या बसमधे तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला; बारामतीत थरकाप उडवणारी घटना
4

धावत्या बसमधे तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला; बारामतीत थरकाप उडवणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.