कल्याण : एटीएममध्ये पैसे डिपॉझिट (Cash Deposit In Bank ATM) करण्याच्या बहाण्याने एका इसमाला तीन जणांनी गंडा (Cheating) घातल्याची घटना कल्याण पूर्व काटेमानिवली (Kalyan East Katemanivli) परिसरात घडली आहे. हे तिन्ही भामटे सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाले असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsevadi Police Station) या तीन जनांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये खेमराज नंदनवार (Khemraj Nandanwar) हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्याने याचवेळी एटीएम मध्ये आलेल्या एकाची मदत घेतली.
[read_also content=”१० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला कबरीत, पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक; जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/crime/jharkhand-bokaro-crime-news-dead-body-of-man-missing-for-10-days-recovered-from-grave-wife-and-her-lover-arrested-nrvb-366815.html”]
एटीएम मध्ये दोन साथीदार देखील त्या वेळेला होते. काही वेळाने रिसिप्ट घेण्यासाठी आलेल्या खेमराज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.