Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल

कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 16, 2025 | 01:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसात करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेद मोर्चा देखील काढण्यात आला आहे.

Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना

नेमकं काय प्रकरण?

हातकणंगले तालुक्यातील किणी येथे अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित अल्पवयीन तरुण बसमधून येत असतांना त्रास देत असल्याचा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितले होते. आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आई घरात नसतांना आलेल्या तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा अशी चर्चा परिसरात आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं आहे. पेठवडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन

गोरेगाव पूर्वेतील आरे मिल्क कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उंचीवरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नैराश्येने ग्रस्त होती आणि अंबानी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये मुलींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिस या प्रकरणाचाही तपास करत आहेत. आत्महत्या केलेली मुलगी अकरावीची विद्यार्थिनी होती. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. घटनेच्या वेळी ती तिच्या बेडरूममध्ये होती, तर तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते. तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट सोडलेली नाही.
पीडिता तिच्या बेडरूममध्ये अभ्यासाला बसली होती. तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते आणि वडील कामावर गेले होते. आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात अपघाती मृत्यू (एडीआर) नोंदवण्यात आला आहे.
Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Web Title: Tired of being harassed by a young man on the bus a college girl took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai : क्लिनरअपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही
1

Navi Mumbai : क्लिनरअपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप
2

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

Akola Crime: पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चेतून पत्नीने घेतला टोकाचा निर्णय; विहिरीत उडी मारून संपवले जीवन
3

Akola Crime: पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चेतून पत्नीने घेतला टोकाचा निर्णय; विहिरीत उडी मारून संपवले जीवन

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना
4

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.