मुंबईच्या परेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयकडे पाहून माथेफिरूने एयर रायफलने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सतत बेल वाजवून त्रास देत असल्याच्या रागातून या व्यक्ती हवेत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ही घटना मुंबईच्या परळ येथील नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभकुमार अविनाशकुमार सिंग असे आहे.
बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…
नेमकं काय घडलं?
सौरभने एका ऑनलाईन मेडिकल अॅपवरून शुक्रवारी सायंकाळी औषध मागवले होते. सौरभने दिलेल्या ऑर्डरनुसार डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन बिल्डिंगमध्ये पोहोचला. सौरभने दरवाजा उघडला नाही म्हणून डिलिव्हरी बॉयने दोन ते तीन वेळा घराची बेल वाजवली. याचाच राग सौरभला आला. त्याने संतापून दरवाजा उघडला आणि डिलिव्हरी बॉयकडे पाहून रायफलने हवेत गोळीबार केला.
गोळीबाराची माहिती मिळताच मुख्य नियंत्रण कक्षाने तात्काळ ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सौरभकडून चौकशी सुरु केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.
गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन
गोरेगाव पूर्वेतील आरे मिल्क कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उंचीवरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नैराश्येने ग्रस्त होती आणि अंबानी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये मुलींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिस या प्रकरणाचाही तपास करत आहेत. आत्महत्या केलेली मुलगी अकरावीची विद्यार्थिनी होती. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. घटनेच्या वेळी ती तिच्या बेडरूममध्ये होती, तर तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते. तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट सोडलेली नाही.
पीडिता तिच्या बेडरूममध्ये अभ्यासाला बसली होती. तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते आणि वडील कामावर गेले होते. आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात अपघाती मृत्यू (एडीआर) नोंदवण्यात आला आहे.
ED Raid: काँग्रेस आमदाराच्या घरी EDची छापेमारी; कोट्यवधींच घबाड जप्त