बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. “तू आमचा वाद का मिटवतोस?” असा सवाल करत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना भेंड टाकळी (ता. गेवराई) येथे घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश वाव्हाळ असे असून, या प्रकरणी तिघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ED Raid: काँग्रेस आमदाराच्या घरी EDची छापेमारी; कोट्यवधींच घबाड जप्त
नेमकं काय घडलं?
भेंड टाकळी येथील दोन भावांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद सुरु होता. या वादाचे गांभीर्य वाढत जात होते. वाद वाढत असल्याने सतीश वाव्हळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद सोडवण्याच्या हेतूने गेलेल्या सतीश यांच्यावरच तिथे उपस्थित तिघांनी राग काढला. “तू आमच्या वादात का पडतोस?” असा जाब विचारत त्यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यात सतीश वाव्हाळ गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल?
या मारहाण प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून. आरोपींचा शोध सुरु आहे. मारहाणीच्या या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन
गोरेगाव पूर्वेतील आरे मिल्क कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उंचीवरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नैराश्येने ग्रस्त होती आणि अंबानी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये मुलींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिस या प्रकरणाचाही तपास करत आहेत. आत्महत्या केलेली मुलगी अकरावीची विद्यार्थिनी होती. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. घटनेच्या वेळी ती तिच्या बेडरूममध्ये होती, तर तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते. तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट सोडलेली नाही.
पीडिता तिच्या बेडरूममध्ये अभ्यासाला बसली होती. तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते आणि वडील कामावर गेले होते. आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात अपघाती मृत्यू (एडीआर) नोंदवण्यात आला आहे.
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना