Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: कामगारांनी सोडून न जाण्यासाठी मालकिणीचाच ‘भलताच’ डाव; मोहोळ पोलिसांकडून गुन्ह्याचा पर्दाफाश

कोण कधी कोणत्या पद्धतीने डोकं लावेल काहीच सांगता येत नाही. आता तर चक्क मालकिणीनेच दरोड्याचा बनाव केला असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूरमधील मोहोळमध्ये घडली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 10:54 PM
मालकिणीचा भलताच डाव, अडकली पोलिसांच्या जाळ्यात

मालकिणीचा भलताच डाव, अडकली पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • मालकिणीने रचला बनाव
  • कामगारांनी सोडून न जाण्यासाठी स्वतःच केला दरोड्याचा बनाव
  • नक्की काय घडले
​मोहोळ: आपल्या शेतात कामाला असलेले सालगडी कामगार काम सोडून जाऊ नयेत, या भीतीपोटी मोहोळ तालुक्यातील बोपले येथील एका महिला मालकिणीने स्वतःच्याच घरावर दरोडा पडल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत या खोट्या तक्रारीचा छडा लावला असून, फिर्यादी महिलेनेच हा सर्व बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

नक्की काय घडले?

​याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ​फिर्यादी सुगंधा विलास ढेरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास, त्यांचे पती यवतमाळला गेले असताना, त्यांच्याकडे कामाला असलेले सालगडी शिवदास यशवंत मडावी आणि त्यांची पत्नी रंजना मडावी (रा. चिरादेवी, जि. चंद्रपूर) यांनी घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांचे हात-पाय बांधून, मारहाण करून कपाटातील ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले.

​​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांचे पथक तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी येथे रवाना झाले. तेथून संशयित सालगड्यांना ताब्यात घेऊन मोहोळला आणून सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी दरम्यान फिर्यादीच्या कथनात आणि वस्तुस्थितीत तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला.

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

​कसून चौकशी केल्यावर सत्य बाहेर 

​पोलिसांनी जेव्हा फिर्यादी सुगंधा ढेरे यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी सत्य कबूल केले. “सालगड्यांनी काम सोडून जाऊ नये” या एकमेव उद्देशाने त्यांनी हा चोरीचा आणि मारहाणीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​​ही कारवाई पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. एका खोट्या तक्रारीमुळे पोलीस प्रशासनाचा वेळ आणि श्रम वाया गेल्याने आता संबंधित महिलेवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नये, असे आवाहन मोहोळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: To prevent workers from leaving female owner staged a robbery hoax mohol police uncover the crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solapur Crime
  • Solapur News

संबंधित बातम्या

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
1

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक
2

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
3

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
4

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.