Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तब्बल एक कोटींपेक्षा अधिक किमतीची व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2026 | 09:05 PM
Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

Follow Us
Follow Us:
  • तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची धडक कारवाई
  • व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोन जणांना अटक
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
निलेश महाडिक/ नालासोपारा: नालासोपाऱ्यात शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून १ किलो ८५८ ग्रॅम वजनाची, सुमारे १ कोटी ८५ लाख ८० हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे.

गुप्त माहितीनंतर सापळा

शनिवारी तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ९० फूट रोड, प्रगतीनगर परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणली जाणार आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

धक्कादायक! नोकरीचे आमीष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक

1.85 कोटींचा मुद्देमाल जप्त

त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ९० फूट रोड, प्रगतीनगर येथे सापळा रचून कादर गफार करगना (वय ५२) याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे काळसर-पिवळसर, मेणासारखी दिसणारी १ किलो ८५८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ८५ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा

शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी आरोपीविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम २, ३९, ४४, ४८(अ), ४९(ब), ५१ आणि ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या आरोपीलाही अटक

तपासादरम्यान जप्त केलेली व्हेल माशाची उलटी किशोर महादेव तपसाळे (वय ३९) याने दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime: “हनुमान चालीसा म्हण नाहीतर…” मंदिर सचिवाला गोळी मारण्याची धमकी, नवी मुंबईत खळबळजनक प्रकार

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बनकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आनंद पेंडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्यासह अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, दिगांबर परजने, श्रीधर कांबळे, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम, अक्षय झांजुर्ने, शशिकांत पोटे, प्रसाद पालवे, प्रकाश दवने, अनिल सोनवणे आणि ज्योतीराज झंजे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Two accused arrested for selling whale vomit in nalasopara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • crime news
  • Nalasopara
  • Whale

संबंधित बातम्या

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
1

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
2

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…
3

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
4

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.