Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; दोन आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 13) रात्री तळेगाव पुणे- मुंबई महामार्गावर घडली. यातील चालक व क्लिनरवर गुन्ह्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2025 | 06:10 PM
वाहतूक पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; दोन आरोपींना 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

वाहतूक पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; दोन आरोपींना 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 13) रात्री तळेगाव पुणे- मुंबई महामार्गावर घडली. यातील चालक व क्लिनरवर गुन्ह्याचा गुन्हा दाखल केला आहे. मावळ न्यायालयाने दोन्ही आरोपींना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिथुन वसंत धेंडे (वय 44 रा. उरुळी कांचन पुणे) अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. रोहन इसब खान (वय 24, रा. सिंगार, पुनाना हिंदाना, जि. मेवात राज्य हरयाणा) उमर दिन मोहम्मद (वय 19, रा. बरसाना, मथुरा राज्य उत्तर प्रदेश) असे पोलीस हवालदाराचा खून केलेल्या चालक व क्लिनर आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बाजुकडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव HR 74 B 3677 क्रमांकाचा कंटेनर चालक रोहन इसब खान याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाचा जाणून बुजून चिरडून खून केला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. याबाबतची पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोलवरून कंटेनर थांबविण्याचे आदेश आल्याने कंटेनर थांबवत असताना, कंटेनर थांबविण्याचे नाटक करत भरभाव वेगाने पळवून वाहतूक पोलिस धेंडे यांना चिरडले. अपघातानंतर काही तासातच कंटेनर जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी नशेच्या आहारी असल्याचे दिसत होते.

मावळ न्यायालयात बुधवारी (दि.14) दुपारी हजर केले असता, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना दिनांक 19 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रॅफिक वॉर्डन कुंडलिक पंढरीनाथ सुतार यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्यावर उरुळी कांचन पुणे येथे बुधवारी (दि. 14) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक कुमार कदम आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बहुसंख्येने उपस्थित होते. मिथुन धेंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आईचा हात धरून ओढत आईला म्हणाला आपल्या बाबासाठी किती लोक आले आहेत असे बोलतच उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. धेंडे यांच्या कुटुंबाचा आधार गेला असून त्यांच्या पत्नीला पोलीस प्रशासनाने त्वरीत नोकरी द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. मितभाषी, सुस्वभावी, कायमच मदतीची भावना असणारे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्या मृत्यूने पुणे ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. धेंडे यांनी लोणावळा, कामशेत व वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये नोकरी केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांसोबत जनसंपर्क होता. या गुन्ह्याचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.

Web Title: Two accused remanded in police custody in traffic policemans death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Accident Case
  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या
1

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ
3

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार
4

फोन करुन प्रेयसीला भेटायला बोलावले, नंतर गायरानामध्ये नेले अन्…; सासवडमधील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.