Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह; मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर!

पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून भाजप नेते विक्रम शिरसट यांनी मंदिर समिती आणि नगरपालिकेला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 06:29 PM
चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह

Follow Us
Follow Us:

 

  • चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह
  • मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर
पंढरपूर (प्रतिनिधी): पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीमध्ये सध्या पुरुषोत्तम मासानिमित्त दररोज एक लाखापेक्षा जास्त भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत आहेत. अशा अत्यंत गर्दीच्या आणि पवित्र वातावरणात पंढरपुरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात दररोज एक बेवारस मृतदेह सापडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, आज पुन्हा एकदा नदीपात्रात दोन बेवारस मृतदेह आढळल्याने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नदीपात्रात बेवारस मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच, भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूर शहर पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली आणि स्वतः पुढाकार घेत शववाहिकेची व्यवस्था करून मृतदेह रुग्णालयात रवाना केले.या गंभीर प्रकरणावर बोलताना विक्रम शिरसट यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

“पवित्र चंद्रभागेच्या पात्रात दररोज अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. जर प्रशासनाने या बेवारस मृतदेहांची वेळीच आणि सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली नाही, तर आम्ही हे मृतदेह थेट पंढरपूर नगरपालिकेच्या दारात आणून ठेवू आणि तीव्र आंदोलन करू,” असा इशारा शिरसट यांनी दिला.

Pandharpur : विठ्ठलाच्या दारात भाविकांची लूट? मंदिर समितीची मोठी कारवाई

दररोज लाखो भाविक येत असलेल्या पंढरपुरात नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सुस्त झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आता पंढरपूरकरांमधून केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देण्याची मागणी

अशा घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय कारवाई पूर्ण होईपर्यंत, तसेच मृतदेहांचे शवविच्छेदन होईपर्यंत सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मनोज परमार आणि सर्वगोड हे घटनास्थळी थांबून मोलाचे सामाजिक काम करतात. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत, “मंदिर समितीने या दोन्ही कार्यकर्त्यांना ठराविक मानधन सुरू करावे,” अशी मागणीही शिरसट यांनी यावेळी केली.

पंढरपूरचा कायापालट होणार! ४१५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता; ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Web Title: Two unclaimed bodies in the sacred bed of the chandrabhaga river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • crime news
  • pandharpur

संबंधित बातम्या

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू
1

Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात; बेदरकार ट्रकने अनेकांना चिरडले, 12 जणांचा जागीच मृत्यू

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
2

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
3

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
4

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.