Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारुच्या नशेत दोन तरुणींचा भररस्त्यात राडा, एकमेकींना मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 03:19 PM
दारुच्या नशेत दोन तरुणींचा भररस्त्यात राडा, एकमेकींना मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

दारुच्या नशेत दोन तरुणींचा भररस्त्यात राडा, एकमेकींना मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दारू प्यायल्यानंतर नशा चढते आणि या नशेत कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच दोन तरुणींनी नशेत धक्कादायक प्रकार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे घडला आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आरती प्रकाश कांबळे (वय 30, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (वय 25, रा. उस्मानपुरा, पीर बाजार) अशी अटक केलेल्या तरुणींची नावे आहेत. दोन्ही तरुणी नशेत आल्यावर रस्त्यावरच एकमेकींना शिवीगाळ करू लागल्या. त्यानंतर जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाजवळ जाऊन त्यांनी तोडफोड केली. दुकानातील काच फोडल्या. त्यानंतर त्या मुख्य रस्त्यावर आल्या आणि पुन्हा एकमेकींना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणींना ताब्यात घेतले. घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दोन मटण दुकान मालकांत हाणामारी

पुलाची शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Two young women under the influence of alcohol fought with each other in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Video Viral

संबंधित बातम्या

नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अन् पीडिता गर्भवती राहताच…
1

नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अन् पीडिता गर्भवती राहताच…

कोल्हापुर हादरलं! धारदार शस्त्राने सपासप वार करुन तरुणाचा खून; कारण काय तर…
2

कोल्हापुर हादरलं! धारदार शस्त्राने सपासप वार करुन तरुणाचा खून; कारण काय तर…

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा
3

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

Crime News Live Updates : पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगावातील घटनेने खळबळ
4

Crime News Live Updates : पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगावातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.