पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट (फोटो - सोशल मिडिया)
चारचाकी वाहनाची काच फोडून रोख रक्कम लंपास
पाबळ शिक्रापूर मार्गावर भरदिवसा घडला गुन्हा
दोन अज्ञात इसमांनी फोडली काच
पाबळ: पाबळ शिक्रापूर मार्गावर भरदिवसा चारचाकी वाहनाची काच फोडून रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरण्याची धाडसी घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वैभव विकास आडगळे वय २४ वर्ष व्यवसाय बांधकाम राहणार जउळके बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे हे आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच १४ एम एल ९९ ७४ ने पाबळ शिक्रापूर मार्गावरील हॉटेल शिवराज येथे आले होते. त्यांनी गाडी बाहेर उभी करून दुपारी सुमारे एक वाजून तीस मिनिटांनी जेवणासाठी आत प्रवेश केला.
यावेळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकी वाहन क्रमांक एम एच १४ सी डब्ल्यू ४४ ५० युनिकॉन दुचाकी वरून येत चारचाकी वाहनाची चालकाच्या बाजूच्या मागील काच फोडली एकाने डोक्यावर संरक्षण हेल्मेट घातले होते तर दुसऱ्याने डोक्याला रुमाल बांधला होता.
वाहनातील पिशवीमधून एक लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे अंतर्गत पाबळ दूर क्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय थेऊरकर करीत आहेत. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई
राजगुरुनगर, खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी येथील अविष्कार एंटरप्रायझेस या मूळ पुरवठादाराकडून तसेच मावळ तालुक्यातील उरसे येथे महंमद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी मँगो पल्प तयार करण्यासाठी वापरली जाणारी भेसळयुक्त साखर, गाईचे दूध, तसेच केमिकलयुक्त ‘केशर कलर’ मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.






