Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 02:54 PM
वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन ट्रकांसह तब्बल २७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत योगेश संजय ढोरे (रा. वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. ४ जून २०२६ रोजी दुपारी ते व त्यांच्या सहकाऱ्यांसह जांभुळ फाटा परिसरात असताना दोन ट्रकमधून मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी तपासणी केली असता एमएच-५०-१५९६ क्रमांकाचा ट्रक, ज्यावर “ज्योतिर्लिंग प्रसन्न” असे लिहिले होते, तसेच एमएच-१०-सीआर-४३३७ क्रमांकाचा “सिद्धनाथ प्रसन्न” नावाचा दुसरा ट्रक आढळून आला. या दोन्ही वाहनांमध्ये एकूण १४ गाई आणि १६ वासरे व बैल जातीची जनावरे कोंबून भरल्याचे आढळले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जनावरांना कोणत्याही प्रकारचे चारा-पाणी न देता अत्यंत दाटीवाटीने ट्रकमध्ये भरून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. जनावरांना वेदना, त्रास आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागतील अशा परिस्थितीत त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक आणि ३ लाख १२ हजार रुपये किमतीची ३० जनावरे असा एकूण २७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक गोरखनाथ कोळेकर (रा. तुर्भे, नवी मुंबई), रोहन नानासो बेंद्रे (रा. शिराळा, जि. सांगली) आणि कुंडलिक सर्जेराव बेंद्रे (रा. शिवरवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६, केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ तसेच प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा क्रमांक १७२/२०२६ म्हणून दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आशिष काळे करीत आहेत. जनावरांच्या अवैध आणि अमानुष वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

कारवाईतील जप्त मुद्देमाल

  • १४ गाई, १६ वासरे व बैल जातीची जनावरे
  • ट्रक क्रमांक एमएच-५०-१५९६
  • ट्रक क्रमांक एमएच-१०-सीआर-४३३७
  • जनावरांची किंमत : ३.१२ लाख
  • ट्रकांची किंमत : २४ लाख
  • एकूण जप्त मुद्देमाल : २७.१२ लाख

Web Title: Vadgaon maval police have taken major action against those involved in inhumane animal transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
1

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
2

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं
3

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी
4

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.