Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

वेदांत बंडगर हत्याप्रकरणी सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत 'एन.जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगार टोळीवर मकोका लागू केला आहे. टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ आरोपींवर कारवाईला मंजुरी मिळाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 10:04 PM
वेदांत बंडगर हत्येप्रकरणी 'एन.जी. ग्रुप'वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी 'एन.जी. ग्रुप'वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली शहराला हादरवून सोडणाऱ्या शाळकरी विद्यार्थी वेदांत मारुती बंडगर हत्येप्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी अखेर ‘एन.जी. ग्रुप’ या संघटित गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला आहे. टोळीप्रमुख निलेश विठोबा गडदे याच्यासह नऊ आरोपींवर मकोकाची कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे.

या कारवाईत निलेश गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, नानासो उर्फ सागर चौगुले, अतुल वायदंडे, संदेश उर्फ सॅडी घागरे, एक अल्पवयीन, मलिक शेख आणि महंमद नदाफ यांचा समावेश आहे.

२०१७ पासून जिल्ह्यात दहशत

पोलीस तपासात निलेश गडदे याने ‘एन.जी. ग्रुप’ या संघटित गुन्हेगार टोळीची स्थापना करून २०१७ पासून सांगली जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचे निष्पन्न झाले आहे. टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारहाण, विनयभंग, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच अंमली पदार्थांच्या लागवडीसारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

खंडणीच्या वादातून वेदांतचा बळी

मिरज तालुक्यातील रेल्वे मालधक्का कामाच्या ठेक्यावरून झालेल्या वादातून या गुन्ह्याची पार्श्वभूमी तयार झाली. ठेकेदार लक्ष्मण खरात यांना धमकावत खंडणीची मागणी करण्यात आली. त्याविरोधात हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर पुढे सरसावल्यानंतर गडदे टोळीने सूड उगविण्याचा कट रचला. बाळासाहेब बंडगर यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने सांगलीत आलेल्या आरोपींकडून त्यांच्या घरासमोर अंगणात बसलेल्या निरपराध वेदांत बंडगर याच्यावर गोळीबार करण्यात आला. या थरारक घटनेत वेदांतचा मृत्यू झाला आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.

तपासातून संघटित गुन्हेगारीचे धागेदोरे

संजयनगर पोलीस ठाण्यातील या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपासात वेदांत हत्येमागे संपूर्ण एन.जी. ग्रुप सक्रिय असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सरकारी अभियोक्ता ज्योती डाके यांच्या अभिप्रायानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. त्यानंतर आरोपींवर मकोका लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संघटित गुन्हेगारीविरोधातील मोठा दणका

वेदांत बंडगर हत्येनंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत होती. आता गडदे टोळीवर मकोका लागू झाल्याने संघटित गुन्हेगारीविरोधातील ही सांगली पोलिसांची मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे.

Web Title: Vedant bandgar murder ng group mcoca action sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • Crime in Sangli
  • MCOCA Action
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
2

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
3

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल
4

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.