(फोटो सौजन्य: Pinterest)
टॅटूच्या मदतीने पटली महिलेची ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिमपटनममध्ये एक अज्ञात मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख कल्याणी अशी पटली आहे. सांगितले जात आहे की, कुटुंबियांनी तिच्या हातावरील टॅटू पाहून मृतदेहाची ओळख पटवली. याच्या मदतीने तपास अधिकाऱ्यांना तिची ओळख पटवण्यास मोठी मदत मिळाली.
मटणाचे दुकान चालवत होता आरोपी
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी शफी जो मटणाचे दुकान चालवत होता याचा या प्रकरणाशी मोठा हात आहे. शफी आणि कल्याणीमध्ये जवळचे संबंध होते आणि पैशांवरुन त्यांच्यात वादही होत होते. कल्याणीच्या मुलाशी संबंधित एका जुन्या वादामुळेही त्यांच्या नात्यात कटुता आली होती.
हत्येनंतर मृतदेहाचे ९ तुकडे
तपासातील निष्कर्षांनुसार, १७ सप्टेंबर रोजी आरोपी शफी कल्याणीला भवनीपुरम येथील त्याच्या घरी घेऊन गेला. सांगितले जात आहे की, पैशांवरुन त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. यानंतर शफीने कथितरित्या चाकूच्या मदतीने कल्याणीचा गळा चिरला आणि जागीच तिला ठार केले. पोलिसांना संशय आहे की, शफीने मृतदेहाला एकूण ९ तुकड्यांमध्ये कापले आणि मग मटणाच्या दुकानात काम करणाऱ्या गुरुवुलुच्या मदतीने मृतदेहाच्या तुकड्यांचा बंदोबस्त केला. सांगितले जात आहे की, या तुकड्यांना त्याने गोल्लापुडी परिसरातील एका थंड पाण्याच्या कालव्यात फेकून दिले.
पोलिसांनी दोघांना केली अटक
सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शफी आणि त्याचा साथीदार गुरुवुलु यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील त्यांच्या भूमिकेवर तपास केला जात असून घटनेचा कालानुक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस घटनेमागील हेतू, दोन्ही संशयितांची वेगवेगळी भूमिका आणि मृतदेह कसा वाहून नेण्यात आला किंवा त्याची कशी विल्हेवाट लावण्यात आली या सर्व बाबींचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.






