Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारीच राहणाऱ्या एका तरूणाने ओळखीचा फायदा घेत संबंधित ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली असावी. दुसरीकडे मुलगी बराच वेळ नजरेस न पडल्याने आईवडिलांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनीदेखील तातडीने तापस सुरू केला असता, जवळच्याच शेताच्या परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आला.
खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास पथकांना कामाला लावण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय (Pune Crime News) मिळाला पाहिजे,” अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या 9 वर्षीय मुलीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत शेतात नेलं आणि अत्याचार करून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. (Pune Crime News) जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंच्या गावातच ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.





