
crime (फोटो सौजन्य: social media)
“माझ्यासोबत चल”…
या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीचा शिक्षण घेत आहे. सुदर्शन शिंदे असे आरोपीचे नाव आहे. सुदर्शन शिंदे या तरुणाने पीडितेच्या हात धरून
“माझ्यासोबत चल” असे म्हणत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलींने ही बाब घरी सांगितली. तिच्या वडिलांनी जाब विचारण्याचा ठरवलं. तिचे वडील आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र या जाब विचारण्यालाच आव्हान मानत सुदर्शन शिंदे गावातील सुमारे 15 जणांना एकत्र करून मुलीच्या घरात शिरला.
काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण
या १५ जणांच्या टोळीने जातीवाचक शिवीगाळ करत पीडित अल्पवयीन मुलीची काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण केली. हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
१६ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून सुदर्शन शिंदे याच्यासह एकूण 16 जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी ॲक्ट) तसेच इतर 21 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनेनंतर हमदापूर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
दिवाळीच्या सुमारास परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका तरुणाचा खून करून वृद्ध दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. आता खुनी दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबुराव उर्फ बाबुशा सावळा पवार (वय ६०, रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारांसह वालूर झरी आणि पार्डी येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड
Ans: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर गावात.
Ans: एकूण 16 जणांवर.
Ans: अॅट्रॉसिटी ॲक्टसह भारतीय दंड संहितेतील 21 कलमे.