Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
पोलिसांना ज्या रशियन महिलेचा मृतदेह उत्तर गोव्याच्या अरंबोल भागात सापडला होता त्या महिलेचं नाव एलेना कस्थानोवा असे आहे. एलेना कस्थानोवा ही लिव्ह इन पार्टनर होती आरोपी अलेक्सी लियोनोव याची. एलेनाचा गळा चिरण्यात आला होता. गुरुवारी रात्री ९.१५ वाजता घरमालकाने खोलीत तिचा मृतदेह पाहिला आणि हा प्रकार समोर आला. त्यांनतर आरोपी अलेक्सी लियोनोव याची चौकशी केली. तेव्हा त्याने आणखी एका महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. तीच नाव एलेना वानेएवा (३७) असे. तिचा मृतदेह मोरजिम गावात बाथरुममध्ये नग्नावस्थेत मृतदेह सापडला. तिचा देखील गळा चिरण्यात आला होता. या दोन्ही हत्येची कबुली अलेक्सीने दिली.
गोव्यातच नाही तर…
मात्र त्याने यासोबतच १५ महिलांना मोक्ष दिल्याचा दावा केला आहे. हा तरुण रशियन महिलांशी मैत्री करत होता आणि त्यांना प्रेमात पाडत होता. त्यानांतर महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्यास आरोपी अलेक्सी पैश्यांसाठी महिलांची हत्या करत होता. आता पर्यंत त्याने १५ महिलांची हत्या केल्याचा दावा केला आहे. त्याने केवळ गोव्यातच नाही तर हिमाचल प्रदेश येथे देखील हत्या केल्याची कबुली दली. एकूण त्याने गोव्यात आणि हिमाचल प्रदेशात १५ महिलांची हत्या केली.
सध्या तरी दोन हत्यांचा छडा लागला असून पोलिसांकडून इतर हत्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अजून काही धक्कादायक माहिती समोर येते का, आरोपी आणखी काही गंभीर गुन्हे लपवत आहे का, किंवा चौकशीत तो आणखी हत्यांची कबुली देतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दोन महिलांच्या हत्याप्रकरणी त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Ans: 37 वर्षीय रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव.
Ans: सध्या दोन हत्या निश्चित झाल्या आहेत.
Ans: आरोपीचा दावा खरा आहे का व इतर हत्यांचा संबंध आहे का याची चौकशी.






