पत्नीने पतीची हत्या केली
बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप
हत्येचे कारण काय?
माहीतीनुसार, सदर घटना ही दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी परिसरातून समोर येत आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिचा मोबाईन फोन चेक केला. यावरुन दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि त्याच रात्री पत्नीने ओढणीच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या केली. मृताची ओळख मुस्तकीम उर्फ साहिल अशी पटली आहे. घटनेनंतर पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पत्नी अलीशाला (20) अटक केली. पतीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या ओढणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे.
आरोपीने गुन्हा कबूल केला
शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, २ जुलै रोजी साधारण ३.५२ च्या सुमारास जगतपुरी पोलिसांना दिल्लीतील रशीद मार्केटमध्ये एका महिलेने आपल्या पतीचा गळा दाबून खून केल्याचा पीसीआर कॉल आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, जिथे त्यांना मुस्तकीम उर्फ साहिल (19) मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी तत्काळ साहिलला रुग्णालयात दाखल केले जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
मृतकाच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारीवर २ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. अलीशा घटनास्थळावरुन फरार झाली होती. अशात तपासादरम्यान गुरुद्वारात छापा टाकल्यानंतर तिथून अलीशाला ताब्यात घेण्यात आलं. सखोल चाैकशीनंतर, अखेर पोलिसांसमोर अलीशाने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीने सांगितले की, पतीला तिच्या विवाहबाह्य संबंधांविषयी संशय आला होता, ज्यामुळे त्याने रात्री तिचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्यात पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. अलीशाने सांगितले की, भांडणावेळी पतीने तिला मारहाण देखील केली ज्यामुळे रागात येऊन तिने ओढणीने गळा दाबून पतीची हत्या केली. काही वेळीने मृताची आई जेव्हा तिथे पोहचली तेव्हा ती घटनास्थळावरुन फरार झाली आणि गुरुद्वारात जाऊन लपली.
मागच्या वर्षी झालं होत लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीम एक डिलीव्हरी बाॅय असून गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी त्याचे आणि अलीशाचे लग्न पार पडले होते. सांगितलं जात आहे की, लग्नापासून दोघांमध्ये वाद सुरु होते. या भांडणांमुळेच अलीशा सासरी नाही तर माहेरी अधिक काळ घालवायची. यामुळेच मुस्तकीमला आपल्या पत्नीवर शंका येऊ लागली होती. गेल्या सोमवारीच अलीशा माहेरातून सासरी परतली होती. गुरुवारी पती-पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले आणि यातच मुस्तकीमने अलीशाला मारहाण करायला सुरुवात केली. या गोष्टीवरुन अलीशाला राग अनावर झाला आणि तिने ओढणीने गळा दाबतच पतीची हत्या केली.






