Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khan Sir News: खान सर जाणार तुरुंगात? गोळीबार प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल; पाटणा पोलीस कधीही करू शकतात अटक

Fir Against Khan Sir: कोचिंग सेंटरमधील गोळीबाराच्या घटनेबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप ठेवत पाटणा पोलिसांनी खान सर यांच्याविरुद्ध 'आर्म्स ॲक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 06:03 PM
खान सर जाणार तुरुंगात? गोळीबार प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल (Photo Credit- X)

खान सर जाणार तुरुंगात? गोळीबार प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • खान सर जाणार तुरुंगात?
  • गोळीबार प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
  • पाटणा पोलीस कधीही करू शकतात अटक
Khan Sir News: पाटण्यातील दोन कोचिंग संस्थांमधील वादामुळे रोशन आनंद सर यांना कारावास भोगावा लागल्यानंतर, आता फैसल खान (उर्फ खान सर) यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. कोचिंग सेंटरमधील गोळीबाराच्या घटनेबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप ठेवत पाटणा पोलिसांनी खान सर यांच्याविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओ काल समोर आला, त्यानंतर खान सर यांच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली; त्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

खान सर यांच्या उपस्थितीत गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये (FIR) फैसल म्हणजेच खान सर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ही गोळीबाराची घटना खान सर यांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत दाखल केलेल्या या गुन्ह्यात त्यांचे नाव असल्याने, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन न मिळाल्यास खान सर यांना अटकेचा सामना करावा लागू शकतो.

Khan Sir Net Worth: अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी ते करोडोंचा टर्नओव्हर; ‘खान सर’ ब्रँड कसा तयार झाला?

गोळीबार स्वसंरक्षणासाठी केल्याचा खान सर यांचा दावा

एफआयआरमध्ये नाव आल्यानंतर खान सर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, घटनेदरम्यान सुरक्षारक्षकाने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला होता. मंगळवारी रात्री ही घटना घडल्यानंतर लगेचच, खान सर यांनी दावा केला होता की त्यांच्या कोचिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्यादरम्यान अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी आपला दावा मागे घेतला आणि सांगितले की, घटनेनंतरच्या गोंधळाच्या वातावरणात सुरक्षारक्षकाने त्यांना जी माहिती दिली होती, तीच त्यांनी केवळ पुनरावृत्ती केली होती.

खान सर यांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक

त्यानंतर, गुरुवारी सकाळी रोशन आनंद यांच्या ‘ज्ञान बिंदू’ या कोचिंग संस्थेने फैसल खान यांचे सुरक्षारक्षक गोळीबार करताना दिसणारा व्हिडिओ सादर करून खान सर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाच्या संदर्भात खान सर यांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांना आधीच अटक करण्यात आली होती. त्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

कोण आहेत खान सर?

खान सर हे देशातील एक लोकप्रिय आणि चर्चित शिक्षक आहेत. हे मूळचे उत्तर प्रदेशच्या देवरियाचे आहेत. पाटणात बऱ्याच काळापासून ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची शिकवणी देत आहेत. आपल्या कमी आणि स्वस्त फी साठी ते देशभर ओळखले जातात. त्यांचे ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ नावाचे कोचिंगल सेंटर आहे, शिवाय यूट्यूबवर देखील त्यांचे लाखो सब्सक्राइबर्स आहेत.

खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर फायरिंग, सिक्योरिटी गार्डला मारहाण; स्वस्त फी ठरली कारणीभूत?

Web Title: Will khan sir go to jail case registered under the arms act in connection with the shooting incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • crime news
  • Firing News
  • patna news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे…’; ‘त्या’ प्रकरणात रोहित पवार आक्रमक
1

Maharashtra Politics: ‘काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे…’; ‘त्या’ प्रकरणात रोहित पवार आक्रमक

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…
2

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल
3

35 सेकंदात 30 वेळा चाकूने वार, पंजाबच्या मोहालीत एक्स-बाॅयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसुन गर्लफ्रेंडची केली हत्या; सीसीटिव्ही व्हायरल

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
4

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.