उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एका पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात महिलेचा कथित स्वरूपात विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी एका कॉन्स्टेबलविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारेच कॉन्स्टेबल विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai: नायगाव घरकुल लाच प्रकरणात मोठी कारवाई; 9 अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त
व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला आणि निलंबित कॉन्स्टेबलमधील वाद कैद झाला होता. तसेच या महिला पोलिसांच्या गाडीकडे कॉन्स्टेबलला ओढून नेतानाही दिसत आहेत.
पीडितेने केलेले आरोप काय?
पीडित महिलेने तक्रार नोंदवतांना आरोप केला आहे की, नजीराबाद नजीराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस रिस्पॉन्स व्हेहिकल सेवेमध्ये (पीआरव्ही) तैनात असणाऱ्या कॉन्स्टेबल बृजेश सिंहने भररस्त्यात तिची छेड काढली. “मी एकटी होते, म्हणून सुरुवातीस शांत राहिले, पण त्याचे गैरवर्तन सुरूच होते”; अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.
हात मुरगळला, फोन खेचण्याचा प्रयत्न…
तिने घरी पोहोचल्यानंतर हा घडलेला प्रकार आपल्या आई आणि ताईला सांगितला तिने पुढे सांगितले की, आई आणि ताई सोबत ती घटनास्थळी पुन्हा पोहोचले. त्यावेळेसही कॉन्स्टेबल बृजेश सिंह तेथेच तैनात होता. जेव्हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने कथित स्वरुपात तिचा फोन खेचण्याचा प्रयत्न केला आणि हातही मुरगळला, यामुळे बांगड्या फुटल्या, असाही आरोपी पीडितेने केलाय. यानंतर तिने बहिणीच्या मदतीने पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले.
तात्काळ निलंबनाची कारवाई
सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वरूप नगर) सुमित सुधाकर रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विनयभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलीय. प्राथमिक तपासात आरोप खरे असल्याचे आढळून आलंय. त्यामुळे कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहितीही सहाय्यक पोलीस आयुक्त रामटेके यांनी दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील काकादेव भागामध्ये घडली आहे.






