बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई, ग्राहक आणि ब्रँडचा वारसा जपण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
भारतातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित घरगुती कापड ब्रँडपैकी एक असलेल्या बॉम्बे डाईंगने बनावट वस्तूंविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. बॉम्बे डाईंगने कोलकाता, हैदराबाद, केरळ आणि अलिकडेच मुंबईतील एका प्रमुख मॉलमध्ये छापे टाकून बनावट उत्पादनांविरुद्धची आपली लढाई अधिक मजबूत केली आहे. १४५ वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेला हा ब्रँड नेहमीच विश्वास, नावीन्य आणि तडजोड न करता येण्याजोग्या गुणवत्तेसाठी उभा राहिला आहे. विश्वास आणि गुणवत्तेशी तडजोड न करणारा ब्रँड अशी आतापर्यंतची आपली ओळख कायम ठेवण्यास बॉम्बेडाईंग कटिबद्ध आहे.
या कारवाईचा एक भाग म्हणून, बॉम्बे डाईंगने आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याची बाबही उघड केली आहे. बनावट उत्पादने जांभळ्या रंगाच्या लोगोसह विकली जात आहेत, तर मूळ (ओरिजिनल) बॉम्बे डाईंगचा लोगो निळा आहे. हे लक्षात घेता ग्राहकांनी खरेदी करताना लोगो काळजीपूर्वक तपासावा, असे आवाहन बॉम्बे डाईंगने ग्राहकांना केले आहे. आपण बॉम्बे डाईंगची खरी उत्पादने खरेदी करत आहेत याची खात्री ग्राहकांनी करावी, असेही आवाहन ब्रँडने आपल्या ग्राहकांना केले आहे.
बॉम्बे डाईंगच्या निष्ठावंत ग्राहकांचे रक्षण करणे हा या कारवाईमागे कंपनीचा उद्देश आहे. या बरोबरच जेव्हा कोणी “बॉम्बे डाईंग” खरेदी करते तेव्हा त्यांना ब्रँडची ओळख असलेले प्रामाणिक आणि दर्जेदार उत्पादन मिळायला हवे. याची खात्री करण्याच्या व्यापक वचनबद्धतेचा देखील ही कारवाई एक भाग आहे. बनावट उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाच्या वस्तू मूळ वस्तू म्हणून देऊन ग्राहकांना केवळ आर्थिकदृष्ट्याच फसवत नाहीत, तर बॉम्बे डाईंगने पिढ्यानपिढ्या निर्माण केलेल्या विश्वासालाही हानी पोहोचवतात. कंपनीच्या खऱ्या दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादनाची नक्कल करता येत नाही, दर्जेदार उत्पादनांचा पर्याय बनावट उत्पादने कधीही होऊ शकणार नाही, या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी कंपनी अशा अनैतिक कृत्यांवर कारवाई करत आहे.
बॉम्बे डाईंगचे सीएफओ खिरोदा जेना म्हणतात, “आमची समर्पित टीम उपाय शोधण्यासाठी आणि बनावट उत्पादनांविरुद्ध लढण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. बॉम्बे डाईंगने उचलेले हे कारवाईचे पाऊल केवळ आमच्या ब्रँडचे संरक्षण करावे, यापेक्षा ते लाखो कुटुंबांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी अधिक आहे. बॉम्बे डाईंग निवडणारे प्रत्येक कुटुंब आमच्या ब्रँडची ओळख असणारी खरी गुणवत्ता, अस्सलपणा आणि विश्वासार्हता अनुभवण्यास पात्र आहे.”
बॉम्बे डाईंग हा ब्रँड केवळ बनावट वस्तू तयार करणाऱ्या उत्पादकांवर पाळत ठेवण्याचे काम करत नसून, स्थानिक अधिकारी, किरकोळ भागीदार आणि उद्योगातील भागधारकांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. या द्वारे एक स्वच्छ, निष्पक्ष बाजारपेठ तयार व्हावी असा कंपनीचा प्रयत्न आहे. या पावलांसह, बॉम्बे डाईंग विश्वास, कालातीत डिझाइन आणि अतुलनीय गुणवत्ता एकत्रित करणारी उत्पादने वितरित करण्यासाठी शतकापूर्वी दिलेले वचन पाळण्याचे ठामपणे सांगत आहे.






