भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक फिल्मी स्टाईल हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाने दुसऱ्याला तळ्यात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत विरली (बु) येथील नरेश दुनेदार (४५) याचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणात नारायण मेश्राम (४२) या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
False Case Defence Tips: पत्नीने खोट्या गुन्ह्यात अडकवले तर….? असा करा स्वत:चा बचाव
काय घडलं नेमकं?
मृतक नरेश आणि आरोपी नारायण हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक तळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान आरोपी मेश्राम याने नरेशवर पैश्यांची चोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली. या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामणे नरेशला तळ्यात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केले.
दरम्यान घटनास्थळावरून उपस्थित काही नागरिकांनी हे बघितलं आणि लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पवनी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी लाखांदूरचे ठाणेदार यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार
भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
भंडारा जिल्ह्यातील २२ वर्षीय पीडित तरुणी हिची आरोपी तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. आरोपी आणि पीडित हे भंडारा शहरालगत असलेल्या एका गावातील आहेत. आरोपी तरुण हे दोघेही मित्र असून त्यांनी पीडितेला देसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यांनतर २० सप्टेंबरला आरोपींनी तिला भेटायला बोलावले. आरोपींनी पीडितेला गुंगीचं औषध दिलं. यांनतर तिला तिच्या घरी पोहोचवून देण्याच्या बहाण्याने गावालगत असलेल्या कॅनल मार्गावरील निर्जनस्थळी नेत एकानं बळजबरीनं अत्याचार केला. त्यानंतर दुसर्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला.
पीडित तरुणीने ओपींच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घर गाठलं. यानंतर भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांना आता अटक केली आहे. प्रज्वल पांडे (27) आणि मोहित बांते (29) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचं नावं आहेत. पोलिस या प्रकरणी सखोल तपास करत असून आरोपींना न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.
Mumbai: नायगाव घरकुल लाच प्रकरणात मोठी कारवाई; 9 अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त






