उत्तरप्रदेशमधे महिला अत्याचारांच्या घटना थांबण्याच नाव घेत नाही आहे. गाझियाबादमधील (Ghaziabad) पॅाश सोसायटीत सोसायटीच्या तळघरात महिला सुरक्षा रक्षकावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार (Woman security guard gang-raped in basement of society) केल्याची घटना समोर आली होती. या पिडितेवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
[read_also content=”धक्कादायक! 5 तासात 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनं हादरलं कोटा, आता रविवारी No Test, No Study जिल्ह्याधिकांऱ्यांचा आदेश https://www.navarashtra.com/india/2-teens-die-by-suicide-in-6-hours-in-kota-rajasthan-govt-asks-coaching-centers-to-halt-tests-nrps-450649.html”]
दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद येथील एका पॉश सोसायटीत १९ वर्षीय महिला सुरक्षारक्षक तैनात होती. ती मुळची झारखंडची असून दीड महिन्यापूर्वीच गाझियाबादला नोकरीसाठी आली होती. रविवारी सोसायटीतच्या बेसमेंटमध्ये तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल केले आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पुढे येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. तिला सोसायटीमधील सुपरवायझर आणि इतर दोन गार्डने मारहाण केली आणि तिने विरोध केल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडितेच्या चुलत बहिणीचे आरोप केला आहे की, सामूहिक अत्याचारानंतर आरोपींनी कोल्ड ड्रिंकमध्ये विष मिसळले आणि तिला ते पिण्यास भाग पाडले. डॉक्टरांनीही प्राथमिक तपासात विष दिल्याची पुष्टी केली आहे. गाझियाबादमध्ये प्राथमिक उपचारानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे ती व्हेंटिलेटरवर होती.
डीसीपी विवेक चंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माहिती मिळताच दंडाधिकारीही बयाण नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. ती जास्त काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती, परंतु मुलीने कागदावर लेखी जबाब दिला आहे. यामध्ये ती या घटनेत पर्यवेक्षक अजयचाच सहभाग आहे.” असे लिहिले आहे. इतर दोन अनोळखी तरुणांचा लेखी निवेदनात उल्लेख नसल्याची माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरक्षा पर्यवेक्षक अजय याला पोलिसांनी रविवारीच अटक करण्यात आली आहे.