
नागपुरात ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; चाकूने केले तब्बल 25 वार, डोकं भिंतीवर आपटलं अन्...
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या ठाकरवाडी आणि जामरुंग रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रकजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आदळून आला. चालत्या रेल्वेमधून ही ट्रॉली बॅग खाली फेकली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बीडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या डोक्यात रॉड, घटनास्थळी पोलीस उपस्थित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा अस्थाव्यस्थ अवस्थेत मृतदेह आढळला आहे. गुलाबी रंगाच्या सुटकेस मध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. एका सुटकेसमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते.
नेमके काय घडले?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 16 एप्रिल सकाळी 9:30 च्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळांच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली. बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यानंतर जीआरपी कंट्रोल, जीआरपी पुण्याचे वरिष्ठ पीआय, कर्जत सिटी पोलीस आणि खोपोली पोलीस यांना याची माहिती देण्यात आली.
कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या एपीआय मनीषा आपल्या पथकासह आणि लोनावळा जीआरपी कर्मचारी सुमारे 12.40 वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॉलि बॅग उघडल्यावर त्यामध्ये लाल टी-शर्ट आणि पांढऱ्या लोअरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले होते आणि तिचे हातपाय नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधलेले होते. घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे.
मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना संशय आहे की, कदाचित कोणीतरी चालत्या ट्रेनमधून हा ट्रॉली बॅग खाली फेकला असावा. त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गाड्या जातात, त्या कोणत्या स्टेशनांवर थांबतात, याचा तपास सुरू आहे. त्या त्या स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, जेणेकरून ही बॅग घेऊन रेल्वे परिसरात कोण आलं होतं हे समजू शकेल. गेल्या काही दिवसांपासून पाेलीस हरवलेल्या महिलांची माहितीही गोळा करत आहेत. मृत महिलेच्या वर्णनाशी जुळणाऱ्या मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष आहे. सद्यस्थितीत पोलिस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.