crime (फोटो सौजन्य- pinterest)
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी असलेल्या अमोल चौधरी याच्या डोक्यात रॉड घालून मारहाण करण्यात केल्याची घटना घडली आहे. ही घटना धामणगाव येथील यात्रेत घडली. विशेष म्हणजे ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. घैसासांची ‘ही’ मागणी पोलिसांकडून मान्य
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातून मारहाणीच्या नवं नवीन घटना समोर येतांना पाहायला मिळत आहे. अशीच एक मारहाणीची घटना बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात घडली आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी अमोल चौधरी यांच्यावर मारहाण करण्यात आली आहे. त्यांचा अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल अंभोरा पोलिसांनी घेत त्यांनी जबाब नोंद करून घेतला आहे. अमोल चौधरी हे राजकारणात सक्रिय असून गावातीलच वादातून त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या हल्ल्यामागे कोण आहे आणि हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे समोर येऊ शकणार आहे.
१५ दिवसात तीन हत्या
पहिली हत्या 30 मार्च रोजी धारूर तालुक्यातील कान्नापूर येथे झाली. स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची जुन्यवादातून हत्या झाली. त्या गावातील संतोष देशमुख नावाच्या व्यक्तीने आणि त्याची पत्नी सोनाली देशमुखने त्यांच्या अन्य साथीदारांसह ही हत्या केली. यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे स्वतः सिरसाळा पोलिस ठाण्यात हजर झाले होते.
दुसरी हत्या १ एप्रिल रोजी घडली. अंबाजोगाई येथील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी हत्या १५ एप्रिल रोजी घडली.माजलगाव येथील बाजार रस्त्यावर बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 30 वर्षे) हे दुपारी 2 वाजण्याचा सुमारास उभे असताना आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयत्याने वार केला. यामुळे आगे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फपाळ स्वतः माजलगाव येथील पोलीस ठाण्यात कोयत्यासह हजर झाला.