Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिलाई मशिन, योजनेतून रोख 15 हजार देतो म्हणाला अन् 64 महिलांना गंडा घातला; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

संशयितांनी महिलांकडून एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये स्वीकारून संस्थेच्या नावाने पावत्या दिल्या. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही वस्तू न देता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 15, 2026 | 01:19 PM
धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:

लासलगाव : विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन व १५ हजार रुपये रोख मिळवून देण्याचे सांगून ६४ महिलांकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

याबाबत मनीषा कडलग (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संशयित संजय बोराळे (वय ४२), जयश्री बोराळे (वय ३५, दोघे रा. सोहम सिटी, लासलगाव) तसेच विशाल गरूड (वय ३३, रा. कोटमगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, दि. ११ जून २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत संशयितांनी विंचूर येथील दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात तसेच हनुमाननगर परिसरात महिलांना विविध योजनांचे आमिष दाखवले.

महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन सरकारच्या विश्वकर्मा योजनेतून शिलाई मशीन, रोख रक्कम तसेच पिठ गिरणी, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी वस्तू फक्त २५ टक्के रक्कम भरून मिळतील, उर्वरित रक्कम संस्थेमार्फत व सरकारी अनुदानातून भरली जाईल, असे सांगून महिलांचा विश्वास संपादन करण्यात आला.

संशयितांनी हनुमाननगर येथील ३० महिलांचा बचत गट तयार करून काही महिलांना टेलरमार्फत प्रशिक्षणही दिले. तसेच १५ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सदस्य विशाल गरूड हे गावात येऊन पैसे घेऊन जातील, असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी मनीषा कडलग यांनी विशाल गरूड याला फोन-पे अॅपद्वारे २० हजार रुपये दिले. तसेच ६४ महिलांनी प्रत्येकी ३ हजार ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत रक्कम ऑनलाईन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

संस्थेच्या नावाने पावत्याही दिल्या मात्र नंतर…

संशयितांनी महिलांकडून एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये स्वीकारून संस्थेच्या नावाने पावत्या दिल्या. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही वस्तू न देता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निफाड, सिन्नर, येवला व इतर तालुक्यांतील अनेक महिलांकडूनही अशाच प्रकारे पैसे गोळा केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्…

Web Title: Women defrauded of lakhs of rupees through the lure of schemes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
1

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
3

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
4

भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.