Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेला सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित तपास हा निकालाचा कणा ठरला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 04:58 PM
'पॅन, मतदार ओळखपत्र हे नागरिकत्त्वाचा पुरावा नाही'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'पॅन, मतदार ओळखपत्र हे नागरिकत्त्वाचा पुरावा नाही'; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

गुहागर : गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाडवे (रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशीही शिक्षा ठोठावली. तर विष्णू किसन कनपुरे (रा. पुणे) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेला सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित तपास हा निकालाचा कणा ठरला. तपासादरम्यान जमा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सरकारी पक्षाने भक्कम बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, आशिष बल्लाळ, प्रकाश मोरे, एस. एल. पाटील यांनी केला. सध्या गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील अॅड. पी. आर. साळवी यांनी प्रभावीपणे मांडली. तर पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि हेड कॉन्स्टेबल प्रदीप भंडारी व ए. एस. शिंदे यांनी सातत्याने मेहनत घेतली.

या साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या निर्णायक

या खटल्यात एकूण ५१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचे बंधू गोविंद खरे, विवेक खरे, पत्नी विद्या खरे, आरोपींना दुचाकीवर जाताना पाहणाऱ्या शर्मिला घुमे, चोरीची सोन्याची साखळी खरेदी करणारा सोनार विरसिंह चौहान, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, हस्ताक्षर तज्ज्ञ विनोद मेश्राम व विविध मोबाईल कंपन्यांचे नोडल अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.

हे सुद्धा वाचा : शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या तपास कौशल्याचा विजय

तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आलेला हा निकाल गुहागर पोलिसांच्या तपास कौशल्याचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा मोठा विजय मानला जात आहे. गुन्हा कितीही जुना असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, हा संदेश या निकालातून पुन्हा अधोरेखित झाला असून, गुहागर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: The court has handed down a severe sentence to the accused in the vishwas khre murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Arrested News
  • Court
  • crime news

संबंधित बातम्या

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
1

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
2

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
4

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.