उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देणाऱ्या एका व्यक्तीला कानपूर पोलिसांनी अटक केली आहे (Arrest By Kanpur Police). कानपूर पोलिसांनी बाबू पूर्वा परिसरातून (Babu Purva Area) अमीन (Amin) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपींनी सीएम योगी यांना 112 वर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर लखनऊ पोलिसांनी (Lucknow Police) गुन्हा दाखल केला होता.
सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी, कानपूर पोलीस, सांगतात की, तरुणाला काही कारणास्तव आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना गोवायचे होते, त्यासाठी त्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचा मोबाइल चोरला आणि त्यानंतर त्याच मोबाइलवरून धमकीचे संदेश पाठवले. तपासाच्या आधारे कानपूर पोलिसांनी मोबाईलच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता हे समोर आले.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
मोबाईलच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांचा फोन बेपत्ता झाला होता. कानपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता असे आढळून आले की, अमीन हा तरुण आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना पसंत करत नव्हता कारण ते (वडील) त्यांच्या नात्यावर नाराज होते, त्यानंतर अमीनने प्रेयसीच्या वडिलांना गोवण्याचा कट रचला.
पोलिसांचे म्हणणे आहे की, अमीन आपले वय 18 वर्षे सांगत असून, सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर त्याचे खरे वय कळेल. त्याचबरोबर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात गंभीर कलमे लावण्यात येत आहेत. कानपूर पोलिसांचेही म्हणणे आहे की, ही धमकी केवळ आणि केवळ परस्पर शत्रुत्व निर्माण करण्यासाठी देण्यात आली होती जेणेकरून प्रेयसीच्या वडिलांना गोवण्यात येईल आणि त्याच्या मार्गातला अडसर दूर होईल.
[read_also content=”कल्याणमध्ये दोन कुमारिका मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका; अनिल पॅलेस नंबर एक लॉजिंग व बोर्डिंगमध्ये सुरू होता गोरखधंदा https://www.navarashtra.com/crime/crime-news-rescue-of-two-virgin-girls-from-prostitution-in-kalyan-anil-palace-number-one-lodging-and-boarding-business-was-going-on-nrvb-390692/”]
कानपूर पोलिसांचे सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी म्हणतात की, खर्या अर्थाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकावण्याचा आरोपींचा हेतू नव्हता. कानपूर पोलीस या तरुणाला अटक करून उद्या न्यायालयात हजर करणार असून, तेथून त्याला तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.