Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

राहुल कृष्णा राऊत (वय २७) हा तरुण १८ तारखेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ आपले मित्र टिल्लू अण्णा पवार आणि सुनील गुंजाळ यांच्यासोबत सिगारेट पित बसला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 08:44 AM
प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

Follow Us
Follow Us:

नाशिक : किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हत्येत होण्याच्या घटना नाशिकमध्ये वाढत आहेत. पेठरोडवरील नवनाथ नगर परिसरात सिगारेट दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका २७ वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कृष्णा राऊत (वय २७) हा तरुण १८ तारखेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ आपले मित्र टिल्लू अण्णा पवार आणि सुनील गुंजाळ यांच्यासोबत सिगारेट पित बसला होता. यावेळी संशयित आरोपी रोहिदास वामनराव आहेर (वय २६) तिथे आला आणि त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली.

राहुलने सिगारेट देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या रोहिदासने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार केले. या हल्ल्यात राहुलच्या डोक्याला अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २० तारखेला दुपारी उपचार सुरू असताना राहुलचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहुलचे वडील कृष्णा हरी राऊत (वय ५०) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

आरोपी आहेरविरोधात गुन्हा दाखल

पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी रोहिदास वामनराव आहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार पुढील तपास करत आहेत.

15 वर्षीय बहिणीने केली भावाची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ७ वर्षांच्या मुलाची हत्या त्याच्याच १५ वर्षीय बहिणीनेच केल्याचे समोर आले आहे. लॉलिपॉपवरून या दोघांमध्ये भांडण झालं आणि याच भांडणाचा रूपांतर हत्येत झाला. या घटनेने खळबळ उडाली असून कुटुंबावर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे.

Web Title: Youth attacked with chopper for not giving him cigarettes incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • crime news
  • Nashik Crime
  • Youth Murder

संबंधित बातम्या

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
2

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
3

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई
4

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.