Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

काही महिन्यांपूर्वी संजय व आरोपी यांच्यात भांडण झाले होते. तेव्हापासून आरोपीने खून्नस धरली होती. शुक्रवारी सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास मोनू झोपडपट्टी गल्ली नं. १ परिसरात होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 01:13 PM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; आधी शस्त्रांनी भोसकलं अन् नंतर दगडाने ठेचलं

Follow Us
Follow Us:

नागपूर : जुन्या वादातून एका युवकावर शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दगडाने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली. संजय ऊर्फ मोनू ठाकूर (वय ३५, सद्भावनानगर, नंदनवन) असे मृत युवकाचे नाव आहे. ही थरार घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नंदनवन झोपडपट्टीत गल्ली क्र. १ येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय व आरोपी यांच्यात भांडण झाले होते. तेव्हापासून आरोपीने खून्नस धरली होती. शुक्रवारी सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास मोनू झोपडपट्टी गल्ली नं. १ परिसरात होता. माहिती मिळताच आरोपी आणि त्याचा अल्पवयीन साथीदार असे दोघेजण तेथे आले. त्यांनी शस्त्राने वार करत मोनूला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यानंतर डोक्यावर दगडाने प्रहार करत त्याला निपचित केले आणि पळून गेले. सायंकाळची वेळ असल्याने बहुतांश लोक घरी होते.

Solapur Crime : मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

काहींनी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिला तर काहींनी दार बंद करून घेतले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आसपासच्या नागरिकांचीही विचारपूस केली, मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपींचा सुगावा लागला नव्हता. त्यांच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

नातवाने केला आजीचा खून

नकळत बँकेतून २० हजार रुपये काढल्यामुळे आजीने नातवाला फटकारले. चोर म्हणून सतत टोमणे देऊ लागली. याचा राग मनात धरून नातवाने धारदार शस्त्राने आजीच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार करून हत्या केली. इंदू किशोर चव्हाण (वय ६८, रा. लष्करीबाग) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी राज बागडे (वय २४) याला अटक केली आहे. बँकेतून २० हजार रुपये काढल्यामुळे आजीने नातवाला फटकारले. चोर म्हणून सतत टोमणे देऊ लागली. याचा राग मनात धरून नातवाने धारदार शस्त्राने आजीच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार करून हत्या केली.

Web Title: Youth murder due to old enmity incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Murder Case
  • Nagpur Crime
  • Youth Murder

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
1

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
2

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
3

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
4

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.