Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

गंभीर गुन्ह्यातील तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई तसेच गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 04:42 PM
वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : गंभीर गुन्ह्यातील तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई तसेच गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पत्नीला भेटण्यास आल्यानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. खिडकीतून उडी मारून पळून जाताना थरारकरित्या त्याला पकडण्यात आले. संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८(४), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक सुधीर घुले तसेच पोलिस हवालदार लांडगे यांच्या पथकाने केली.

संतोष धुमाळ हा मागील वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. दरम्यान, आरोपी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाण येथील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस हवालदार लांडगे यांना मिळाली. त्यानूसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. नंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी योग्य ते मार्गदर्शन करून पथकाला आरोपीला पकडण्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी गुलमोहर सोसायटी परिसरासह ये-जा करण्याच्या मार्गावर सापळा रचला. सोसायटीमध्ये प्लॅटची चौकशी करताना आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर साथीदार विपुल उत्तम माजिरे याच्याबाबतही माहिती दिली. विपुल माजिरे बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले यांच्या दुकानाच्या मागे भेटण्यासाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तेथेही सापळा रचला. काही वेळातच विपुल माजिरे तेथे आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

खिडकीतून पळण्याचा प्रयत्न फसला

पोलिसांच्या सापळ्याची चाहूल लागताच संतोष धुमाळ खिडकीतून बाहेर पडून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला जागीच पकडले. नंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले.

हे सुद्धा वाचा : चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी

कोण आहे संतोष धुमाळ?

संतोष धुमाळ सराईत गुन्हेगार असून, त्याची कोथरूड भागात दहशत देखील आहे. संतोष धुमाळ हा एके काळी नीलेश घायवळच्या टोळीचा सक्रिय सदस्य होता. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. धुमाळ मूळचा मुळशी तालुक्यातील असून, सध्या तो कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, कालांतराने तो घायवळची टोळी सोडून बाहेर पडला. त्यानंतर त्याचे घायवळ टोळीशी वाद सुरू झाले. काही महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यातून घायवळ टोळीने संतोष धुमाळवर हल्ला करण्याचे नियोजन देखील केले होते.

Web Title: The kothrud police have arrested gangster santosh dhumal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले
1

Arjun Aravind: ‘ChatGPT वर शोधल्या ‘हत्या करण्याच्या पद्धती’ अमेरिकेत 17 वर्षांच्या भारतीय मुलाने आई आणि भावाला संपवले

महापालिकेचा शिपाई शिवानंद पाटीलवर आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

महापालिकेचा शिपाई शिवानंद पाटीलवर आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
3

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक
4

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.