देशात 75% पेक्षा जास्त पात्र लोकसंख्येचं पूर्णपणे लसीकरण झाले आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी (PM Modi) त्यांचे अभिनंदन केलं आहे. “सर्व प्रौढांपैकी 75% जणांच पूर्णपणे लसीकरण (Vaccination) झालं आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन.” असे त्यांनी म्हणटलं आहे. जे लोक आमची लसीकरण मोहीमेला यशस्वी करत आहेत त्यांचा अभिमान आहे. ”
त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विट करत अभिनंदन केले. “‘सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या 75% प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आणखी मजबूत होत आहोत. सर्व नियमांचे पालन करा.” नियम पाळत राहावे लागेल आणि लवकरात लवकर लस घ्यावी लागेल.” असे मांडविया म्हणाले.
देशातील लसीकरणाची स्थिती
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 62,22,682 नागरिकांच लसीकरण करण्यात आले आहे. देशात लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या १६५ कोटींहून अधिक झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भारतातील एकूण लसीकरणाचा आकडा 100 कोटींवर पोहोचला होता. जानेवारी 2022 मध्ये हाच आकडा 150 कोटींच्या वर पोहोचला होता.
[read_also content=”गुंठेवारीच्या नियमानुसार औद्योगिक अनाधिकृत बांधकामे अधिकृत करावी; पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी https://www.navarashtra.com/latest-news/unauthorized-industrial-constructions-should-be-authorized-as-per-gunthewari-rules-demand-of-pimpri-chinchwad-small-industries-association-to-deputy-chief-minister-ajit-pawar-nrdm-229875.html”]
देशात कोरोनाचे २ लाखांहून अधिक रुग्ण आहेत
शनिवारी देशात २.३४ लाख नवे कोरोना बाधित आढळले. त्याच वेळी 893 लोकांचा मृत्यू झाला. चांगली गोष्ट म्हणजे या काळात ३.५१ लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 2.35 लाख कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती आणि 871 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच, मागील दिवसाच्या तुलनेत नवीन कोरोना रुग्णाच्या संख्येच किंचित घट झाली आहे.
[read_also content=”मच्छिमारांना दिलासा! मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची मोठी घोषणा https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mechanical-boat-owners-will-get-diesel-refund-amount-nrps-229829.html”]