File Photo : Vote
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २९ ऑक्टोबरपर्यंत मतदार संख्या ३ लाख १२ हजार ६६४ झाली आहे. यामध्ये १ लाख ५८ हजार ७२१ पुरुष, तर १ लाख ५३ हजार ८८१ स्त्री आणि ६२ इतर मतदार आहेत. मतदार संघात २६६ मतदान केंद्रे, २ सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण २६८ मतदान केंद्रे आहेत. त्याचबरोबर २१ विविध ठिकाणच्या इमारती मध्ये ५ किंवा ५ हून अधिक मतदान केंद्रे आहेत.
हेदेखील वाचा : MVA Manifesto : कंत्राटी नोकरभरती, परीक्षा, बेरोजगारीबाबत मोठी गॅरंटी ; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी काय काय?
दरम्यान, विभागाकडील ४८ कर्मचारी अशा एकुण ३४० कर्मचाऱ्यांमार्फत ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप होणार आहे.
इचलकरंजी मतदार संघातील मतदारांना केंद्र निहाय २४ पर्यवेक्षक, २६८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच महापालिका कर विभागाकडील ४८ कर्मचारी अशा एकुण ३४० कर्मचार्यांच्या मार्फत ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप होणार आहे. या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी इचलकरंजी मतदारसंघांत मतदार चिठ्ठी वाटपाचे काम १०० टक्के करण्याचे आवाहन केले.
इचलकरंजी मतदार संघांत नियुक्त केलेल्या एकुण १२८० अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण ९ आणि १० नोव्हेंबर रोजी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झाले. याचठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे.
१२५० टपाली मतदान
इचलकरंजी मतदार संघात सुमारे १२५० टपाली मतपत्रिकेद्वारे टपाली मतदान होणार आहे. सैन्य दलातील १५९ मतदार तर इचलकरंजी मतदार संघात असलेले परंतु याच मतदार संघात निवडणूक कर्तव्यावर असलेले सुमारे ५०० मतदार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सांगितले.
राज्यात कोट्यवधी मतदार बजावणार हक्क
राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार आहेत. त्याशिवाय 1 लाख 16 हजार 355 सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात पहिल्यांदाच 20.93 लाख नवीन मतदार मतदान करणार आहेत.
हेदेखील वाचा : सावधान! रेल्वेमध्ये भेळ खाताय? मग हा व्हिडिओ पाहाच; पुन्हा खाताना 100 वेळा विचार कराल