फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट यांच्याशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. खाद्यपदार्थांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकजण कोणत्या ठिकाणी कोणते फुड चांगले तसेच कोणते रेस्टॉरंट चांगले यावर व्हिडिओ बनवतात. पण काही वेळा खराब व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही काहीही बाहेर खाताना शंभर वेळा विचार कराल.
अनेकांना प्रवासामध्ये भेळ खायला खूप आवडते. विशेष करून लांबच्या प्रवासामध्ये भूक लागल्यावर भेळ हा उत्तम पर्याय ठरतो. कुरमुरे, शेव, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, तिखट डाळ असे विविध पदार्थ एकत्र करून तयार केलेली भेळ खाण्याची मजा काही औरच असते. पण तुम्ही रेल्वे प्रवासात भेळ विकत घेऊन खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला किळवाणे तर वाटेलच पण रागही येईल. हा व्हिडिओ ट्रेनमधील असून भेळ बनवतानाचा आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्य तुम्ही पाहू शकता की, एक भेळ विक्रेता ट्रेनमध्ये अशा पद्धतीने भेळ बनवत आहे की पाहून तुमची भेळ खाण्याची इच्छा पुन्हा कधीच होणार नाही. तो चक्क ट्रेनच्या बाथरूमजवळच्या जमिनीवर काकडी, कांदा चिरताना दिसत आहे. म्हणजे भेळ किती अस्वच्छ असू शकते हे यावरून तुम्ही समजू शकता. यामुळे अनेक आजार उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती भेळ बनवत असतानाच कोणी एका प्रवाशांने त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे.
व्हायरल व्हिडिओ
ट्रेन के सफर में गलती से भी चने मत खायेगा
देखिए कैसे तैयार किया जाता है 😡 pic.twitter.com/yOC9AO9QDZ
— 𝗠𝗮𝗻𝗶𝘀𝗵 𝗗𝗮𝘁𝘁 𝗧𝗶𝘄𝗮𝗿𝗶 (@Tiwari__Saab) October 21, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Tiwari__Saab या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनमधील आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी त्या भेळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, तो प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या व्यक्तीला तुरूंगात टाकले पाहिजे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, अशा गोष्टींचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. कृपया करून काहीही बाहेरचे खाऊ नका असा सल्ला त्याने दिला आहे. हा व्हिडिओ पाहून एकच प्रश्न मनात येतो. त्याची अस्वच्छ भेळ खाऊन कोणी आजारी पडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.