दिल्लीत पुन्हा आपची सत्ता; विधानसभा निवडणुकीआधी केजरीवाल यांच्या पक्षाला दिलासा
दिल्ली महागरपालिकेच्या महापौर निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार महेश खिंची यांची गुरुवारी दिल्लीच्या महापौरपदी निवड करण्यात आली. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील राजधानीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. आपचे दलित उमेदवार खिची यांनी भाजपच्या किशन लाल यांचा ३ मतांच्या फरकाने पराभव केला.
राजकारणासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
खिंची यांना 133 मते मिळाली, तर किशन लाल यांना 130 मते मिळाली. दोन मते अवैध ठरवली गेली. काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. आप आणि भाजपा यांच्यातील दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे. तर एप्रिल महिन्यात स्थगित केलेल्या निवडणुकीत काँग्रेसने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला आणि महापौरपदासाठी वर्तमान कार्यकाळाऐवजी पूर्ण कार्यकाळाची मागणी केली होती
दरम्यान, महापौर निवडणुकीत एकूण 265 जणांनी मतदान केलं, त्यात दोन मते बाद ठरली. निवडणुकीदरम्यान काही राजकीय घडोमोडीही पहायला मिळाल्या. आपच्या 10 नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केलं. निवडणुकीत आपला 132 मते मिळाली, तर भाजप देखील 132 मते मिळाली, पण त्यातील दोन मते अवैध ठरवली गेली. दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रदर्शनानंतर एका नगरसेवकाने आपला समर्थन दिलं, त्यामुळे आपची मतांची संख्या 133 वर पोहोचली.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आम आदमी पक्षाला क्रॉस वोटिंगचा धोका आधीच होता. वॉर्ड समितीच्या निवडणुकीत आपला तीन विभागात क्रॉस वोटिंगचा सामना करावा लागला होता. काही नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. साउथ झोनमधील आपचे उमेदवाराचा पराभव होता होता राहिला होता. आणि आता महापौर निवडणुकीत जवळपास 10 मते भाजपला मिळाली. तरीही, याचा फायदा भाजपाला झाला नाही आणि आपचे महेश खिंची 3 मतांनी निवडून आले.
सामाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या नंतर, आम आदमी पार्टीच्या मोठ्या दलित चेहऱ्याच्या शोधात महेश खींची यांनी ही भूमिका भरण्याचा निर्णय घेतला. करोल बाग विधानसभा क्षेत्रातील देवनगर वॉर्ड 84 चे नगरसेवक महेश खिंची यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मोतीलाल नेहरू कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली आहे. महेश खिंची यांना व्यावसायिक पातळीवर वित्तीय सल्लागार म्हणून ओळखले आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाला सरकारवर आरोप झाले. केजरीवाला यांच्यासह अनेक मंत्र्यांना तरुंगात जावं लागलं. केजरीवाल यांना तर मुख्यमंत्री सोडावं वागल्या. गेलया २ वर्षांत दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अऱविंद केजरीवा यांनी आपण जनतेत जाऊन न्याय मागणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र तरीही दिल्लीचं महापौरपद राखण्यात आम आमदमी पक्षाला यश आलं आहे. २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी आपला हा मोठा दिलासा मिळाला आहे.