अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे पोस्टर बारामतीमध्ये ठरत आहेत लक्षवेधी (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांमध्ये उत्साह आहेच त्याचबरोबर धाकधुक देखील आहे. निकालापूर्वीच राज्यामध्ये अनेक नेत्यांचे विजयी पोस्टर दिसत आहे. पण सध्या अजित पवार यांच्या एका पोस्टरची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.23) समोर येणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांचे विजयाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. आता अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांच अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. पण त्याचबरोबर अजित पवार यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन असा देखील आशय पोस्टरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पर्वती विधानसभा मतदारसंघातील आणि बारामतीमध्ये अजित पवार यांचे विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही पोस्टरवर अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्याचा देखील उल्लेख केला आहे. यावरुन चर्चांना उधाण आले आहे.
#WATCH | Maharashtra: A poster depicting NCP chief and Deputy CM Ajit Pawar as the Chief Minister, put by in Pune by party leader Santosh Nangare. The poster has now been taken down.
Counting for #MaharashtraElection2024 will take place tomorrow, 23rd November. pic.twitter.com/SnX9cGqI2E
— ANI (@ANI) November 22, 2024
अजित पवार हे चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळायचा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये देखील अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. आता त्यांनी मुख्यमंत्री व्हायचे आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट इच्छा देखील बोलून दाखवली आहे. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतल्यानंतर देखील अजित पवार यांनी हे स्पष्ट केले होते. आता बारामतीमध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे पोस्टर हे निकालाआधीच लावण्यात आले आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पवार विरुद्ध पवार
बारामतीमध्ये ‘हाय व्होल्टेज’ निवडणूक झाल्याचे दिसून आले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील चुरशीची लढत झाली. तसेच पवार कुटुंबामध्ये लढत झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीमध्ये फक्त राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत नाही तर पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली. आता बारामतीकरांनी कोणाला कौल दिला याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आणि अजित पवार गटाकडून दमदाटी करुन मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात आहेत. असा आरोप केला. तर अजित पवार यांनी या आरोपांचे खंडन केले. यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे फक्त राज्याचे नाही तर देशातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.