मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी आमदार उत्तम जानकर व गावकऱ्यांवर गुन्हा दाखल (फोटो - सोशल मीडिया)
अकलूज : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले. मात्र सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता. गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता. याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लावण्यात आले होते. आता या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग यांनी दि. 02 डिसेंबर ते 05 डिसेंबर २०२४ या दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम १६३ अन्वये मौजे मारकडवाडी या गावात जमावबंदी करण्यात आली होती. परंतु सदर गावातील ग्रामस्थ यांनी मारकडवाडी गावात सकाळी 7 वाजल्यापासून सुमारे २५० ते ३०० अंदाजे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रीया राबवण्याची तयारी केली होती.
या गावात उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचे आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था कामी महसुल नायब तहसिलदार सिद्धिनाथ विठठल जावीर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या फिर्यादीवरून १) गौतम आबा माने रा. कन्हेर ता. माळशिरस, २) बाबा माने रा कन्हेर, ३) मारुती देशमुख रा माळशिरस, ४) युवराज झंजे रा मेडद ५) विष्णु नारणवर रा उंबरे दहिगाव ६) शामराव बंडगर रा तिरवंडी ७) कालिदास रुपनवर, ८) भानुदास सालगुडे रा सदाशिवनगर, ९) तुकाराम ठवरे रा खुडुस १०) बाजी माने रा कन्हेर, ११) दादा माने रा कन्हेर, १२) हनुमंत सरगर रा कचरेवाडी, १३) पांडुरंग वाघमोडे रा माळशिरस, १४) सोमनाथ पिसे रा पुरंदावडे १५) माणिक एकनाथ वाघमोडे रा माळशिरस, १६) हनुमंत ठवरे रा खुडुस, १७) तुकाराम देशमुख रा माळशिरस, १८) जावेद मुलाणी, १९) अजय सकट २०) आनंदा विष्णु मारकड रा मारकडवाडी २१) रणजित सरवदे, २२) रजनिश बनसोडे २३) साजन माने देशमुख २४) संतोष माने २५) अभिजीत साठे, २६) हनुमंत वायदंडे २७) हनुमंत भाऊ शेंडगे २८) बापु मुंगुसकर २९) स्वप्निल पवार सर्वे रा. वेळापुर ३०) स्वप्निल दत्तात्रय वाघमारे रा बागेचीवाडी अकलुज. ३१) रामा शेंडगे रा वेळापुर, ३२) बापु गायकवाड रा पिसेवाडी, ३३) बाबा तुपे रा वेळापुर, ३४) जब्बार मुलाणी रा वेळापुर, ३५) मामा पांढरे रा नातेपुते, ३६) नाथा रुपनवर रा डोंबाळवाडी, ३७) नाना शिंदे रा पिरळे, ३८) प्रकाश कदम रा कदमवाडी ३९) सुनिल भालचंद्र पाटील रा फोंडशिरस ४०) बंडु पाटील रा फॉडशिरस ४१) संतोष सोपान वाघमोडे रा माळशिरस ४२) माऊली पाटील रा नातेपुते ४३) भिमराव नरुटे रा तामशिदवाडी ४४) विक्रम पाटील रा माळसिरस ४५) मनोज दडस रा बांगडे ४६) आप्पासाहेब देशमुख रा माळशिरस ४७) सचिन सावंत रा दहिगाव ४८) सर्जेराव जानकर रा माळशिरस ४९) संतोष देशमुख रा माळशिरस ५०) संतोष बंडगर रा खुडुस ५१) पिनु पाटील रा फोंडशिरस ५२) रोहिदास रणदिवे रा फॉडशिरस, ५३) किसन ढोबळे रा फोंडशिरस, ५४) रामा रणदिवे रा. फोंडशिरस, ५५) दादा लाळगे रा नातेपुते ५६) वैभव दादा रणदिवे रा फोंडशिरस ५७) दिपक दादा रणदिवे रा फोडशिरस ५८) दिपक रामा रणदिवे रा फोंडशिरस, ५९) अशोक बंडगर रा पाटील वस्ती अकलुज ६०) मोहण बापुराव झंजे रा मेडद, ६१) आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे रा मारकडवाडी ६२) सागर तानाजी मारकड रा मारकडवाडी ६३) रामदास शिवाजी काळे रा माळशिरस ६४) समादान भाऊ भोसले रा माळशिरस ६५) जिवन बाळासाहेब देवकाते रा धानोरे वेळापुर ६६) आण्णा मारुती हाक्के रा धानोरे वेळापुर ६७) नाथा सुरेश देवकाते रा धानोरे वेळापुर ६८) काकासाहेब पांडुरंग घुले रा वटपळी माळशिरस ६९) रामभाऊ आण्णा शेंडगे रा वटपळ माळशिरस (७०) बाजी पंढरीनाथ वाघमोडे वटपळी माळशिरस ७१) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे रा नातेपुते ७२) राहुल बाबासो बंडगर रा तिरवंडी ७३) पोपट बाबुराव विर रा अकलुज ७४) शशिकांत मेघराम दिक्षीत रा अकलुज ७५) प्रविण रमेश बागल रा अकलुज ७६) संतोष बाबुराव वाघमोडे रा फॉडशिरस ७७) योगेश नारायण ढोबळे रा फोंडशिरस ७८) संतोष लक्ष्मण वाघमोडे रा फोडशिरस ७९) सचिन मधुकर जाधव रा पुरदावडे ८०) दादा ज्ञानदेव चव्हाण रा पुरदावडे ८१) राजेश विष्णु चव्हाण रा पुरदावडे. ८२) गणेश विजय मारकड रा मारकडवाडी. ८३) सागर बिचुकले रा नातेपुते ८४) प्रेम देवकाते रा नातेपुते. ८५) राजाभाऊ रुपनवर रा एकशिव. ८६) आमदार उत्तमराव शिवदास जानकर रा वेळापुर ८७) रणजित मारकड रा मारकडवाडी. ८८) तेजस पाटील रा धर्मपुरी ८९) शहाजी बाळु वाघमोडे रा मारकडवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर असे व इतर काही लोक यांचेविरूध्द बेकायदेशीर जमाव जमवुन आदेशाचा भंग केला आहे म्हणुन नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं. ३९९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम बी.एन.एस. सन २०२३ चे कलम ,१८९(१),१८९(२),१९०, २२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.