Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकाने उडवली राजकीय वर्तुळात खळबळ; छगन भुजबळ करणार कायदेशीर कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकीय वर्तुळामध्ये ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पुस्तकामधील दाव्यावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करुन आपला रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 08, 2024 | 01:33 PM
Chhagan Bhujbal reaction on The Election That Surprised India'

Chhagan Bhujbal reaction on The Election That Surprised India'

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यामुळे सर्व राजकीय नेते जोरदार कामाला लागले आहेत. मात्र सध्या राजकीय वर्तुळामध्ये एका पुस्तकाची चर्चा सुरु आहे. ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकाने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे पुस्तक पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिले आहे. या पुस्तकामध्ये ईडीच्या जाचामुळे छगन भुजबळ यांनी भाजपसोबत युती केली असल्याचे सांगितले असल्याचा दावा केला आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकरणावर छगन भुजबळ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील सर्व दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप देखील भुजबळ यांनी केला आहे. पुस्तकात आणि वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “लोकसत्ते’बरोबर अशी कोणतीही मुलाखत मी दिली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सर्व भाजपसोबत गेले हा आरोप अनेक दिवसांपासून आमच्यावर होत आहे. तिसरे म्हणजे कोर्टाने महाराष्ट्र सदन प्रकरणात मला ‘क्लिन चीट’ दिली आहे. ही ‘क्लिन चीट’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली होती. त्यावेळी मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पेढेही दिले होते”

हे देखील वाचा : प्रचार सभांमधील घोषणांवरुन रंगलं राजकारण! योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

पुढे ते म्हणाले की, “मला तुरुंगात जाण्याची भीती आहे, असा आरोप जो केला जात आहे, तो मी नाकारत आहे. मी विकासासाठी एकत्र आलो. आमच्याबरोबर ५४ लोक आहेत. त्यांच्यावर प्रत्येकावर ईडीची केस नव्हती. माझ्या मतदार संघात दोन हजार कोटींची कामे सुरु आहे. सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हे पुस्तक का छापण्यात आले? त्यांचा हेतू काय आहे, हे पाहावे लागणार आहे. ठीक आहे, लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. मी पुस्तक वाचलेले नाही. आता मी पुस्तक वाचेल. त्यानंतर माझ्या वकिलांनाही ते वाचण्यास देईल. आठ दिवस माझा निवडणुकांवर फोकस असणार आहे. त्यानंतर मी कायदेशीर कारवाई करणार” असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : ‘भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती’; युवक काँग्रेसचा घणाघात

Web Title: Chhagan bhujbals response to the claim in the book the election that surprised india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 01:33 PM

Topics:  

  • BJP
  • Chhagan Bhujbal
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
1

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
2

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?
3

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

Rahul Gandhi: सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून राहुल गांधींचा BJP-RSSवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लडाखची संस्कृती धोक्यात’
4

Rahul Gandhi: सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून राहुल गांधींचा BJP-RSSवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लडाखची संस्कृती धोक्यात’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.