Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra CM : मोठी बातमी ! शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडतंय काय?

महायुतीचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी भाजपच्या राज्यातील व देशातील नेत्यांना आमंत्रण दिले जात आहे. तसेच शरद पवार व उद्धव ठाकरेंना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2024 | 11:55 AM
devendra fadnavis calls ncp sharad pawar for mahayuti oath ceremony

devendra fadnavis calls ncp sharad pawar for mahayuti oath ceremony

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला. यानंतर अखेर 12 दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. आझाद मैदानावर सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीप्रमाणे विरोधातील नेत्यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

महायुतीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून तीन नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. आता फक्त या तीन नेत्यांचा शपथविधी होणार आहे. राजशिष्टाचारनुसार, या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी फोन देखील केला आहे. आमंत्रणासाठी फडणवीसांनी शरद पवारांना फोन केला होता. मात्र शरद पवार व सुप्रिया सुळे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सोहळ्याला जाणार नसल्याचे समोर आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्याव्यतिरिक्त कोणते नेते उपस्थित राहणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

महायुतीमध्ये एकतर्फी निकालानंतर नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांनी केलेल्या गृह खाते व नगर विकास खाते यांची मागणी भाजपने मान्य केली नाही. आता एकनाथ शिंदे हे शपथविधी सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.  त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. एनडीएचे नेते रामदास आठवले यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.

Web Title: Devendra fadnavis calls ncp sharad pawar for mahayuti maharashtra cm oath ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Sansad Ratna Award : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर
1

Sansad Ratna Award : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर

24 तासांत निर्णय घेण्याची क्षमता फक्त एकनाथ शिंदेंकडेच : डॉ. श्रीकांत शिंदे
2

24 तासांत निर्णय घेण्याची क्षमता फक्त एकनाथ शिंदेंकडेच : डॉ. श्रीकांत शिंदे

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु
3

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु

“मुंबईपासून सुरजागडपर्यंत विकासाचा एक्सप्रेसवे, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
4

“मुंबईपासून सुरजागडपर्यंत विकासाचा एक्सप्रेसवे, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.