बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज
मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मॉडेल मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत जळोची, दिव्यांग मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा माळेगाव बुद्रुक, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे.
मतदार यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने अंध मतदारांना कोणाच्याही मदती खेरीज मतदान करता येणे शक्य आहे.
वडगाव मावळमध्ये मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी
मावळ विधानसभा मतदारसंघात बुधवार (दि. 20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळी मतदान होणार आहे. मतदारांना आवाहन आहे की मतदान कार्डसह आणखी एक ओळखपत्र घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. मतदारसंघात दहशतीचे वातावरण राहणार नाही. यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडा आणि मतदान करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.