Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावनेचे राजकारण संपले, आता अफवांवर विश्वास ठेवू नका; शिवाजीराव कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल

आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायचे आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करायचा आहे, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारांशी संवाद साधताना केलं आहे. गावांत कर्डिलेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2024 | 11:22 AM
भावनेचे राजकारण संपले, आता अफवांवर विश्वास ठेवू नका; शिवाजीराव कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल

भावनेचे राजकारण संपले, आता अफवांवर विश्वास ठेवू नका; शिवाजीराव कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

राहुरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलेही विकासाचे भरीव काम केलेले दिसत नाही. मात्र गावोगावी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामाची गावकरी यादीच वाचून दाखवीत असून ही सरकारच्या कामाची पावती आहे. तालुक्यातील युवकांनी निवडणूक हाती घेतली असल्यामुळे परिवर्तन अटळ आहे. कुठल्याही भूलथापांना व अफवांवर विश्वास न ठेवता भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मतदान करावे असे आव्हान देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.

हेदेखील वाचा- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! CBI कडून नागरिकत्वाविषयी चौकशी सुरू, दिल्ली हायकोर्टाने दिली माहिती

भावनेचे राजकारण संपले, अफवांवर विश्वास ठेवू नका – कर्डिले

वावरथ जांभळी परिसरातील नागरिकांची दळणवळण यांची सोय व्हावी यासाठी पुलाचा प्रलंबित प्रश्न आमदार होताच प्राधान्याने मार्गी लावण्याचे काम करणार आहे. या भागातील नागरिकांचा राहुरीशी संपर्क होण्यासाठी स्वखर्चातून दळणवळणासाठी बोट उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा करत 25 लाखांची अत्याधुनिक बोट देण्याचे काम केले. 2019 ला आमदार न झाल्यामुळे विकासाची कामे होऊ शकली नाहीत. आदिवासी, धनगर समाज तांडा, वस्त्यांवर राहत असून त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम केले आहे. भावनेचे राजकारण संपले असून आता अफवांवर विश्वास ठेवू नका. तनपुरे कुटुंबियांनी सत्तेच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे वाटोळे केले. आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, जांबुळबन, शेरी चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगावथडी, गाडकवाडी, ताहराबाद, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे आदी गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी कर्डिले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेरी चिखलठाणा ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना विधानसभा निवडणूक खर्च म्हणून 21 हजार रुपयांची आर्थिक देणगी देण्यात आली. म्हैसगाव येथील नागरिकांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली व कर्डिले यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

हेदेखील वाचा- सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवार संतापले; म्हणाले,विनाशकाले विपरित बुद्धी

आत्तापर्यंत गावकऱ्यांची ऋणानुबंध कायम ठेवले – कर्डिले

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले पुढे म्हणाले, जांभूळबन, जांभळी वावरथ या आदिवासी गावांमध्ये कधीही आमदार, खासदार, मंत्री, प्रशासन आले नव्हते. मात्र मी 2009 मध्ये आमदार झालो आणि या भागाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत या गावकऱ्यांची ऋणानुबंध कायम ठेवले आहे. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. गावात पहिल्यांदा तात्कालीन जिल्हाधिकारी पी. अन्बलगन यांना आणण्याचे काम केले. ढवळपुरी ते जांभूळबन रस्त्याचे काम मार्गी लावले. विजेचा प्रश्न गंभीर होता तो देखील मार्गी लावला.

मंत्री असूनही तनपुरेंना आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवता आले नाहीत- अविनाश बाचकर

वावरथ जांभळी, जांभूळबन ही दुर्लक्षित गावी होती. या गावाकडे स्वातंत्र्योत्तर काळात कोणीही लक्ष दिले नाही. मात्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे राहुरी तालुक्याचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गावामध्ये आले आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना गावापर्यंत घेऊन आले. त्यामुळे गावाला गावपण मिळाले. राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदिवासी खात्याचे मंत्री असताना देखील तनपुरे आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही. त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवावी, असं आव्हान अविनाश बाचकर यांनी दिले.

राहुरी कारखाना पुन्हा सुरू करू- कर्डिले

तनपुरे कुटुंबियांनी सत्तेच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे वाटोळे केले. सहकारी संस्था बंद पाडण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची जबाबदारी सत्यजित कदम यांच्यावर देतो. त्यांना जी काही मदत लागेल ते केली जाईल. शेरी चिखलठाणा ग्रामस्थांनी मला 21 हजार रुपयांची निवडणुकीसाठी मदत केली ही मला 21 कोटी सारखी आहे, असे कौतुकोद्गार कर्डिले यांनी काढले.‌

Web Title: Emotional politics is over now dont believe on rumor bjp candidate shivajirao kardile criticized tanapure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 11:22 AM

Topics:  

  • Assembly Election
  • assembly election 2024
  • BJP

संबंधित बातम्या

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’
1

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
2

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
3

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.