कळवा मुंब्रा निवडणूक निकाल विधानसभा निवडणुकीत उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले (फोटो – सोशल मीडिया)
ठाणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. अजून मतमोजणी सुरु असून कलांनुसार, राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागांवर यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून केवळ 50 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या एका शिलेदाराने त्यांचा गड राखला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांना बारामतीमध्ये सुद्धा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी 90 हजार अधिक मतांनी आघाडी मिळवली आहे. तर शरद पवार यांचे उमेदवार व नातू युगेंद्र पवार यांना केवळ 69 हजार 827 मतं मिळाली आहेत. त्यामुळे बारामतीची विधानसभेची जागा शरद पवार यांच्या हातातून निसटली आहे. याचा मोठा धक्का त्यांच्या पक्षाला बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार हे देखील पिछाडीवर सुरु आहेत. त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
मात्र यामध्ये शरद पवार यांना केवळ 11 जागांवर आघाडी मिळवण्यात यश आले आहे. शरद पवार यांचे शिलेदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला गड राखला आहे. कळवा मुंब्रा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. सलग चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदार संघातून विजयी मिळवला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या शिलेदाराने आपला गड राखला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर अजित पवार गटाकडून उमेदवार देण्यात आला होता. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदार संघात अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी थेट लढत होती. 1 लाख 57 हजार 141 मते जितेंद्र आव्हाड यांना पडली. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या नजीब मुल्ला यांना 60 हजार 913 मतं पडली. त्यामुळे शरद पवार यांचे उमेदवार जितेंद्र आव्हाड तब्बल 96 हजार 228 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा हा विजय साजरा केला आहे. मात्र महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करता न आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याचे दिसून आले.