File Photo : Vidhan Sabha
म्हसवड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) एकाच टप्प्यात मतदान झाले. राज्यात 65 टक्के मतदान झाल्याचेही आकडेवारी समोर आली आहे. आता उमेदवारांसह मतदारांचे लक्ष 23 तारीख अर्थात मतमोजणीकडे लागले आहे. असे असताना या निकालाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : ‘प्रणिती शिंदे भाजपची ‘बी टीम’, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघात भाजपचे 4 उमेदवार जिंकतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि काँग्रेसचे एक उमेदवार विजयी होतील, अशी शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 72 टक्के मतदान पार पडले. त्यात फलटण तालुक्यामध्ये 71.8, वाई तालुक्यामध्ये 67.58, कोरेगाव तालुक्यामध्ये 77.74, मान तालुक्यामध्ये 71 टक्के, कराड उत्तर 74.67, कराड दक्षिण 76. 26%, पाटण तालुक्यामध्ये 73.25%, सातारा तालुका 63.52%, असे एकूण मतदान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेले मतदान हा मतदानाचा कौल कोणत्या बाजूला जाणारी याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं वातावरण आहे, असं तज्ञांचे मत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अधिक प्रभावी असला तरी सुद्धा या वेळेला या जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेत असतात.
विविध भागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मुसंडी मारलेली दिसत आहे. कारण, भाजपच्या उमेदवारांनी प्रचारांमध्ये एकसंघता दाखवलेली होती. यामुळेच की काय सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा भाजपचे उमेदवार अधिक प्रमाणात निवडून येतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. मात्र, विविध ठिकाणच्या मतदारांचा कौल पाहता शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी केलेला प्रचार व त्यांची प्रचारामध्ये मुसंडी एकूणच या निकालावर परिणाम करणारी अशी आहे.
2019 मध्ये झाले 61.74 टक्के मतदान
राज्यात 2019 मध्ये 61.74 टक्के मतदान झाले होते. आता मात्र, हा आकडा 65 टक्क्यांवर आला आहे. महायुतीत भाजपने 149 जागांवर, शिवसेनेने 81 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 59 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेसने 101, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (SP) 86 उमेदवार उभे केले.
मुंबईत 51.41 टक्के मतदान
मुंबईत 51.41 टक्के मतदान झाले. 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा आकडा 50.67 टक्के होता. 288 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि 1,00,186 मतदान केंद्रांवर 4,100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरले, जे 2019 च्या निवडणुकीत 96,654 केंद्रांपेक्षा जास्त होते.
संबंधित बातम्या : एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी