Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माहीम मतदारसंघातील वादावर अखेर पडदा; सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार, भाजप अमित ठाकरेंचा करणार नाही प्रचार

भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेता उमेदवार देऊ नये, असे भाजपचे मत आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2024 | 07:52 AM
माहीम मतदारसंघातील वाद अखेर संपुष्टात; सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार, भाजप अमित ठाकरेंचा करणार नाही प्रचार

माहीम मतदारसंघातील वाद अखेर संपुष्टात; सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार, भाजप अमित ठाकरेंचा करणार नाही प्रचार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात असे अनेक मतदारसंघ आहेत ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यापैकी एक म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातील विद्यमान आमदार सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत व एकमेव उमेदवार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप मनसेचे अमित ठाकरेंचा प्रचार करणार नसल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्रही समोर आले आहे.

हेही वाचा-US Election : शर्यत अजून संपलेली नाही! ट्रम्प यांच्या विजयानंतरही कमला हॅरिस बनू शकतात अमेरिकेच्या अध्यक्ष? कसं ते जाणून घ्या

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवेसनेला योग्य मार्गावर नेणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या बंडात पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले त्यांचे निकटवर्ती आमदार सरवणकर यांच्या ऐवजी माहीममधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात येणार, अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात निवडणुकांच्या आधीपासूनच रंगत होत्या. त्यातच अमित ठाकरेंनी माहीममध्ये प्रत्यक्ष अर्ज दाखल केल्याने भर पडली.

पण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत हे स्पष्ट केले की, सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह नव्हते आणि भाजपने कधीच सरवणकरांची उमेदवारी मागे घेण्याची विनंतीही आमच्याकडे केली नव्हती. तरीही विधानसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माहीममध्ये नाट्य घडताना दिसले.

दरम्यान, हा सर्व वाद सुरु होण्यामागे एक कारण असेही होते की, भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेता उमेदवार देऊ नये, असे भाजपचे मत आहे. त्यापाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही सांगितले की, माहीममध्ये भाजपचा पाठिंबा हा अमित ठाकरेंना राहील. मात्र, सरवणकरांचा अर्ज कायम राहिल्यानंतर तसेच सरवणकर हे शिंदेंचे अधिकृत उमेदवार असल्याने शेलार यांनी पक्षाची बाजू पुन्हा स्पष्ट केली आहे.

सरवणकरांच्या उमेदवारीवरील सर्व सावट दूर

शेलार यांच्या खुलासानंतर आता सरवणकरांच्या उमेदवारीवरील सर्व सावट दूर झाले असून, महायुतीचे तिन्ही पक्ष माहीम मतदारसंघात सदा सरवणकरांचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमित ठाकरे-महेश सावंत यांचे आव्हान

सरवणकरांनी 2009 पासून माहीम मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, 2009 मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई यांनी सरवणकरांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावर लढताना सरवणकरांनी 46 हजार मते घेतली होती. मनसेचे सरदेसाई यांनी 40 हजार मते घेतली तर त्यावेळी स्वतंत्र लढलेल्या भाजपाने 33 हजार मतांची कमाई केली होती.

संदीप देशपांडेंना 42 हजार मते

2019 मध्ये शिवसेना व भजापाची युती झाल्यानंतर सरवणकरांनी माहीममध्ये 61 हजार मते घेत विजय मिळवला होता. मनसेचे संदीप देशपांडे यांना 42 हजार मते पडली. मनसेची माहीमधील मते साधारण तेवढीच राहिलेली आहेत.

हेही वाचा-Latur Accident : वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू

Web Title: Mahim constituency controversy finally over sada saravankar is the candidate of mahayuti nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 07:52 AM

Topics:  

  • amit thackeray
  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
1

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
4

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.