छगन भुजबळ मंत्रिपदावर मनोज जरांगे पाटील नाराजी व्यक्त केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. सभा आणि चर्चा वाढल्या आहेत. राज्यामध्ये नेत्यांचे आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक खूप गाजणार आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे रंगत वाढली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. अजित पवार गटाचे नेते हे एका बाजूला जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पाठींबा मिळवण्यासाठी अनेक नेते अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ एका बाजूला जरांगे पाटील यांच्यावर टीका केली तर नरहरी झिरवळ यांनी भेट घेतली
राष्ट्रवादी अजित पवार गटाने नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दिंडोरी हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीमध्ये माजी आमदार धनराज महाले यांना शिवसेना शिंदे गटाने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नरहरी झिरवाळ यांनी विविध घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. झिरवाळ शुक्रवारी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर भेटीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. निवडणुकीसाठी सर्वच जण भेटत असतात. त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल. पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही. आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाच्या स्तरावर असते तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. मतदार सुज्ञ झाला आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.