फोटो सौजन्य: Pinterest
Kylaq च्या परफॉर्मन्सबद्दल स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, “2025 हे ब्रँडचे भारतात 25 वे वर्धापन दिन आहे आणि या काळात आम्ही आमचे सर्वोत्तम आणि तेजस्वी उत्पादन पोर्टफोलिओ पाहिले आहे. आता आम्ही नेटवर्क आणि बाजारपेठेतील उपस्थितीच्या बाबतीत आमच्या सर्वात मोठ्या पातळीवर आहोत.
भविष्यातील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “2026 मध्ये प्रवेश करताना आम्ही ही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. यासाठी नवीन प्रॉडक्ट लाँच, विक्री आणि आफ्टर-सेल्स सेवांमध्ये सुधारणा, तसेच आमची पोहोच वाढवून ग्राहकांशी अधिक जवळीक साधण्यावर अधिक भर दिला जाईल.”
2025 हे वर्ष अनेक कारणांनी स्कोडासाठी अत्यंत उत्तम ठरले. सर्वप्रथम, स्कोडाने या वर्षात भारतातील आपल्या उपस्थितीचा 25वा (सिल्व्हर जुबिली) वर्धापन दिन साजरा केला. 25 वर्षांच्या विक्री ऑपरेशन्ससह, स्कोडा ऑटो इंडियाने देशात एक दीर्घ आणि यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.
विक्रीच्या दृष्टीने पाहता, CY2025 मध्ये स्कोडाने आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक विक्री नोंदवली, जी कंपनीच्या धोरणात्मक बदलाचे स्पष्ट संकेत देते. हे यश प्रामुख्याने INDIA 2.5 स्ट्रॅटेजीअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या कायलक SUV मुळे मिळाले आहे.
Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…
ही SUV भारतीय ग्राहकांना स्टँडर्ड स्वरूपात पॉवरफुल 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन, भक्कम सेफ्टी पॅकेज, उत्कृष्ट फिट आणि फिनिश तसेच अनेक आधुनिक फीचर्स देते. 2025 मध्ये स्कोडाने एकूण 72,665 युनिट्सची विक्री केली असून, ही संख्या CY2024 मधील 35,166 युनिट्सच्या विक्रीपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक आहे.






