File Photo : Security
चंद्रपूर : चंद्रपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि.23) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू केले. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : Pune Election: पुणेकरांनी मोडला गेल्या वर्षीच रेकॉर्ड; दिवसभरात तब्बल 65 टक्के झाले मतदान
सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी निर्गमित केले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही बाबींना मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल.
तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परिसरातील सर्व दुकाने / आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील. मतमोजणी केंद्राचे परिसरात मतमोजणी कामावर नेमणूक झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता वाहनतळाची व्यवस्था केली. नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचऱ्यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील.
इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल. भारत निवडणूक आयोगातर्फे वितरित केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तींना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधित असणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात झाले मतदान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बुधवारी (दि.20) एकाच टप्प्यात मतदान झाले. अनेक मतदारांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण नागपुरात एक अजब प्रकार घडल्याचे समोर आले. एकाच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याचे समोर आले आहे. असा प्रकार मोठ्या प्रमाणात पुढे आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मतदानासाठी केंद्रात महिला गेली अन्…
विशेष म्हणजे त्यांचे नाव सुगतनगरमधील मियाको इंग्लिश शाळेतील मतदार केंद्रांवरही त्यांचे नाव होते. येथेही त्या मतदान करण्यास गेल्या. परंतु, येथेही त्यांच्या नावावर मतदान झाले होते. यावर माजी नगरसेवक गौतम पाटील यांनी तक्रार करण्याचे सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी बॅलेट पेपरवर त्यांचे मतदान घेतले.
हेदेखील वाचा : एक्झिट पोलनुसार महायुती, ‘मविआ’त कांटे की टक्कर; सत्तास्थापनेत राज ठाकरे किंगमेकर ठरणार? पहा आतली बातमी