फोटो सौजन्य - Social Media
सलमान खान सध्या त्याच्या आगामी Action सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे बॉलिवूडचा दिग्गज सलमान खान आणि दाक्षिणात्य सिनेमात मोठे कारकीर्द असणारी अभिनेत्री Nayanthara या सिनेमाच्या उद्देशाने पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत, त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन Vamshi Paidipally ने केली आहे तर निर्मिती Dil Raju ने केली आहे. या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर नाही परंतु सिनेमातील आणखीन एक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे, ते म्हणजे ‘Rajpal Yadav!’
राजपाल यादव अनेक वर्षांनी Salman Khan सह Big Screen शेअर करणार आहेत. राजपाल यादव नुकतेच Cheque Bounce प्रकरणात अडकले होते, त्यासाठी त्यांना तिहार तुरुंगातही जावे लागले होते. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या चेतक Awards 2026 या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकांद्वारे नकळतपणे राजपाल यादव यांची खिल्ली उडवली गेली होती, तेव्हा बॉलिवूडचा भाईजान राजपाल यादवसाठी उभा राहिला होता आणि पाठिंबा दिला होता. भाईजानने राजपाल यांना दिलेला शब्द पाळला आहे, 2027 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या एका Action Drama Film मध्ये राजपाल यादव आणि सलमान खान एकत्र झळकणार आहेत.
सलमान खान आणि राजपाल यादव, यापूर्वी ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादव सलमानचा Right Hand म्हणून झळकणार आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरले असल्याचे दृश्य सोशल मीडियावर दिसून येत आहे. सिनेमाची शूटिंग एप्रिल 2026 मध्ये सुरु झाली असून सिनेमा 2027 ईदीच्या दिवशी प्रदर्शित होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राजपालने मानले होते भाईजानचे आभार
Chetak Awards 2026 सोहळ्यात राजपाल यादवची सूत्रसंचलनकांनी नकळत खिल्ली उडवली. यावरून सलमान चांगलाच तापलेला दिसून आला, त्याने राजपाल यादवच्या समर्थनात X पोस्ट शेअर केली. राजपाल यादवने याबाबत सलमानचे आभार मानले होते तसेच सूत्रसंचलकांचा मला दुखवण्याचा काहीही हेतू नव्हता याबाबत एक पोस्ट शेअर केली होती.






